IPL 2024 Mumbai Indians Full Squad List : इंडियन प्रीमयर लीग अर्थात आयपीएलच्या येत्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया (IPL 2024 Auction) पार पडत आहे. दुबईत खेळाडूंच्या भवितव्य ठरवलं जातंय. अशातच आता यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मोठा डाव खेळला असून काही तगड्या आणि युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. नव्या कर्णधाराबरोबरच आता नव्या दमाचे खेळाडू मुंबई इंडियन्सचं भविष्य लिहिणार आहे. पटलणने कोणत्या खेळाडूंना करारबद्ध केलंय पाहुया...
मुंबईने सुरुवातीपासून मोठे डाव खेळले नाहीत. मुंबईने गेराल्ड कोएत्जी (Gerald Coetzee) याला संघात जागा दिलीये. कोएत्जीची मुळ किंमत 2 कोटी होती. मात्र, मुंबईला बुमराहच्या जोडीचा गोलंदाज हवा असल्याने मुंबईने 5 कोटीची किंमत मोजून गेराल्ड कोएत्जी याला करारबद्ध केलं. तर दिलशान मधुशंका (Dilshan Madushanka) याला देखील मुंबईने संधी दिली आहे. श्रीलंकेच्या या प्लेयरने वर्ल्ड कपमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवली होती. त्यामुळे मुंबईने 4.60 कोटी मोजत त्याला आपलंस केलंय. त्याचबरोबर श्रेयस गोपाल (Shreyas Gopal) याला मुंबईने त्याच्या बेस प्राईजवर म्हणजेच 20 लाखात खरेदी केलंय. तसेच मुंबईने नवा मलिंगा म्हटला जाणारा नुवान तुषारा, अंशुल कंबोज आणि ऑलराऊंडकर नमन धीर यांना संघात सामील केलंय.
मुंबईने रिटेन केलेल खेळाडू - हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड.
मुंबई इंडियन्सचे नवे खेळाडू (Mumbai Indians)
गेराल्ड कोएत्जी (Gerald Coetzee) - 5 कोटी
दिलशान मधुशंका (Dilshan Madushanka) - 4.6 कोटी
श्रेयस गोपाल (Shreyas Gopal) - 20 लाख
मोहम्मद नबी (Mohammad Nabi) - 1.5 कोटी
नुवान तुषारा (Nuwan Thushara) - 4.8 कोटी
अंशुल कंबोज (Anshul Kamboj) - 20 लाख
नमन धीर (Naman Dhir) - 20 लाख
शिवालिक शर्मा (Shivalik Sharma) - 20 लाख
IPL 2024 लिलावापूर्वी MI ने सोडलेले खेळाडू:
मोहम्मद. अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅन्सन, झ्ये रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर.