धोनी की गांगुली यामध्ये बेस्ट कर्णधार कोण? हरभजनने दिलं धक्कादायक उत्तर

हरभजन सिंह इतका शांत कसा झाला? 

Updated: Jan 2, 2022, 08:00 AM IST
धोनी की गांगुली यामध्ये बेस्ट कर्णधार कोण? हरभजनने दिलं धक्कादायक उत्तर  title=

मुंबई : भारतीय संघाचा माजी दिग्गज गोलंदाज हरभजन सिंहने क्रिकेटच्या सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. हरभजनने सौरव गांगुली आणि महेंद्र सिंह धोनी या दोघांच्या कर्णधारपदाच्या काळात आपल्या करिअरमधील सर्वाधिक क्रिकेट खेळला गेला. हरभजनला धोनी की गांगुलीमध्ये सर्वात उत्तम कर्णधार कोण? असा सवाल विचारण्यात आला. यावर हरभजनने दिलं उत्तर अतिशय धक्कादायक आहे. 

जेव्हा मी संघाबाहेर होतो तेव्हा सौरव गांगुलीने मला उचलून धरले. मी चांगला खेळलो आणि हॅटट्रिक घेणारा ठरलो. मग धोनीने खूप चांगले नेतृत्व केले.  गांगुलीसोबत मी खूप एन्जॉय केले, त्याने मला खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले, तेव्हाच मी खेळलो. तेव्हाच मी मोठा गोलंदाज झालो. (निवृत्तीनंतर हरभजन सिंगचे कॅप्टन कूल धोनीवर गंभीर आरोप) 

 

माझ्याकडे बीसीसीआयमध्ये पंजाबमधून पाठिंबा देऊ शकेल असा कोणीही नव्हता, जर मला कर्णधारपद मिळाले असते तर मी नक्कीच चांगली कामगिरी केली असती. मी नेहमीच कर्णधारांना मदत केली आहे. फक्त माझ्याकडे कोणतेही सपोर्टिंग अधिकारी नव्हते, अशी खंत देखील हरभजनने व्यक्त केली आहे. 

भारतीय संघात राजकारण होतं का? असा सवाल देखील त्याला विचारण्यात आला? यावर हरभजनने दिलेलं उत्तर धक्कादायक आहे. माझ्यासोबत वाईट घडलं, आता मला कळत नाही की हे राजकारण आहे की अजून काही? 

मी माझ्या पुस्तकात बेधडकपणे लिहिलंय की, माझं काय झालं. क्रिकेटपटू बनणे किती कठीण असते, विशेषत: ज्या क्रिकेटपटूचा पाठींबा नाही. ते माझे पुस्तक सर्व काही सांगेल, असं देखील हरभजनने सांगितलं. 

हरभजन सिंह हल्ली शांत झाला, असं अनेकांना वाटतो? त्यावर दिलेलं उत्तर  वयानुसार बदल होतो. मी शांत राहतो, छान गोष्टी वाटतो. मला आवडत नसलेल्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतो, मला अशा खंड्ड्याच उडी मारायची नाही ज्याचा मला नंतर पश्चाताप होईल.