शारजा : IPL 2020च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विजय विजय मिळवला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून विजय मिळवला.
4000 runs in Blue & Gold for @ImRo45 #Dream11IPL pic.twitter.com/59YXjn9obB
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
रोहित शर्माने आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत ५१ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६८ धावांची दमदार खेळी साकारली. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामन्या दरम्यान, क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला.चार वेळा चॅम्पियन्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल दरम्यान तीन सामने खेळले गेले आहेत. अखेर मुंबई संघाने कमालीची कामगिरी करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.