राष्ट्रीय खेळ पुरस्कारांची घोषणा'; महाराष्ट्रातील दोन खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

Sports National Awards 2024 : यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे.

पुजा पवार | Updated: Jan 2, 2025, 03:18 PM IST
राष्ट्रीय खेळ पुरस्कारांची घोषणा'; महाराष्ट्रातील दोन खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर title=
(Photo Credit : Social Media)

Sports National Awards 2024 : भारत सरकारकडून राष्ट्रीय खेळ पुरस्कारांची घोषणा गुरुवार 2 जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे. यात 2024 मध्ये खेळरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादींनी गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत. यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे. यात महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने 2024 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला कांस्य पदक जिंकवून दिले होते. तर स्वप्नील सह त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडे (Deepali Deshpande) हिला देखील द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

डी गुकेश सहित चौघांना खेळ रत्न पुरस्कार : 

खेळ रत्न हा भारत सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोश्रेष्ठ अवॉर्ड पैकी एक आहे. यंदा भारत सरकारकडून दिला जाणारा खेळरत्न अवॉर्ड नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकतात होती. यंदा खेळरत्न हा 4 खेळाडूंना देण्यात आलेला असून यात मनु भाकर (शूटिंग), डी गुकेश (बुद्धीबळ). हरमनप्रीत सिंह (हॉकी), प्रविण कुमार (पॅरा ऑलम्पिक गोल्ड मेडलीस्ट) यांना जाहीर करण्यात आलेला आहे. 

महाराष्ट्रातील दोघांचा सन्मान : 

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. यात यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्निल कुसाळे याला  भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वप्निल कुसाळे हा मूळ कोल्हापूरचा असून तो रेल्वे कर्मचारी देखील आहे. स्वप्निल कुसाळेच्या रूपाने महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर दुसरं ऑलिम्पिक पदक मिळालं होतं. तर स्वप्निल कुसाळे याला नेमबाजीचं प्रशिक्षण देणाऱ्या दिपाली देशपांडे यांना देखील द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे.