Rohit Sharma vs Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सोमवारी कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि टीमचे प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी रोहित शर्मावर विचारल्या एका प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. त्यामुळे आता मुंबई इंडियन्समध्ये सर्वकाही अलबेल आहे का? असा सवाल विचारला जात आहे. रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) गेली दोन वर्ष बोलणं झालं नाही, असा खुलासा देखील हार्दिक पांड्याने केला होता. अशातच आता यंदाच्या आयपीएल हंगामात कॉमेन्ट्री बॉक्समध्ये कमबॅक करणारे गुरू नवजोत सिंह सिद्घू (Navjot Singh Sidhu) यांनी मुंबईच्या कॅप्टन्सीच्या (MI Captaincy) वादावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. रोहित आणि हार्दिक बद्दल काय म्हणाले सिद्धू?
रोहितचा अनादर नाही...!
आमच्या काळात खराब फॉर्म असूनही एका खेळाडूला संघात कायम ठेवलं जात होतं कारण त्याची जागा घेण्यास कोणताही नवा खेळाडू तयार नव्हता. आता हार्दिक पांड्याने खूप चांगली कामगिरी केल्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये भारतीय कर्णधारपदाची जागा घेत आहे. हा रोहितचा अनादर नसून ही जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया असल्याचं मत नवजोत सिंह सिद्घू यांनी मांडलं आहे.
किंग कोहलीचं कौतूक
मी भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत कोहलीचा समावेश करेन आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्याचा फिटनेस. जसजसा तो मोठा होत जातो तसतसा तो अधिक फिट होत आहे. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तिन्ही फॉरमॅटशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता आहे. हीच गोष्ट रोहिक शर्माला देखील लागू होते, असं नवजोत सिंह सिद्घू म्हणाले.
हार्दिक पांड्या काय म्हणाला होता?
मला गरज पडल्यास रोहित नक्कीच मला मदत करेल. तो टीमचा कर्णधार आहे. तो मला मदत करेल कारण या टीमने त्याच्या नेतृत्वाखाली जे काही साध्य केलंय ते मला पुढे न्यायचंय. यावेळी काही विचित्र किंवा वेगळं होणार नाहीये. मी रोहितच्या नेतृत्वाखाली पूर्ण करियर खेळलोय. त्यामुळे संपूर्ण सिझन त्याचा हात माझ्या खांद्यावर असेल अशी मला आला आशा आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला होता.
मुंबई इंडियन्सचा संघ -
हार्दिक पांड्या (C), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.