नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका दरम्यान टेस्ट मॅच सीरिज २६ जुलैपासून सुरू होणार आहे. रवि शास्त्री कोच बनल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच टेस्ट मॅच असेल.
रवि शास्त्री परतल्यानंतर वनडे आणि टी-२- क्रिकेटमध्ये काही खेळाडू परतू शकतील, असा अंदाज बांधला जातोय. भारत आणि श्रीलंके दरम्यान वन डे सीरिज २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे तर केवळ एक टी-२० मॅच ६ सप्टेंबर रोजी खेळली जाईल.
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे सीरिजसाठी मनीष पांडेची वर्णी टीममध्ये लागू शकते, अशी जोरदार शक्यता वर्तवण्यात येतेय. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मनीषची निवड करण्यात आली होती परंतु, आयपीएल दरम्यान दुखापत झाल्यानं तो चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान खेळू शकला नव्हता.
जखमी झाल्यानं सध्या बाहेर असलेला के एल राहुल श्रीलंका टेस्ट सीरिज दरम्यान टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे. यावेळी तो चांगला खेळला तर वन डे टीमचाही तो एक भाग असू शकतो.
टीम इंडियामध्ये परतण्यासाठी सुरेश रैना चांगलाच प्रयत्न करतोय. छोट्या फॉर्मेटमध्ये रैनाची खेळी तर अनेकांना प्रभावित करते. रवि शास्त्रीही त्याच्या खेळाची स्तुती करताना थकत नाहीत, त्यामुळे रैना पुन्हा मैदानावर दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
स्पिन बॉलर युजवेंद्र चहलचीही या सीरिज दरम्यान वर्णी लागू शकते. युजवेंद्रला भविष्यातील 'स्टार' म्हणून ओळखलं जातंय.
रवी शास्त्री आणि टीम मॅनेजमेंट तरुण खेळाडूंना संधी देऊन वर्ल्डकप २०१९ साठी नवी टीम तयार करण्याच्या मागे लागलेत. अशामध्ये अक्षर पटेल हा टीमसाठी चांगला खेळाडू ठरू शकतो.