Pulwama Terror Attack | सेहवागने घेतली शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

सेहवाग या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे.    

Updated: Feb 16, 2019, 09:17 PM IST
Pulwama Terror Attack | सेहवागने घेतली शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी title=

मुंबई : पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियासाठी सर्वच स्तरातून मदतीचा हात ओघ सुरु आहे. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार शहिदांच्या कुटुंबियांना मदत करत आहे. अशातच नेहमी आपल्या हटके ट्विट मुळे चर्चेत असणारा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपट्टू वीरेंद्र सहवाग यांनी देखील मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्याने शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

 

सेहवाग पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणार आहे. याबबतची माहिती सेहवागने ट्विट करुन दिली आहे. सेहवाग ट्विटद्वारे म्हणाला की,  जवानांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. शहीद जवानांसाठी आपण जितके करु तितके कमीच आहे. शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तर आपण घेऊ शकतो. सेहवागची 'सेहवाग इंटरनॅशनल स्कूल' आहे. सेहवाग म्हणाला की, शहिद झालेल्या जवानांच्या मुलांनी माझ्या शाळेत प्रेवश घेतला तर ते माझ्यासाठी सौभाग्याचे ठरेल.