हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० उशीरा सुरु होणार आहे. हैदराबादमध्ये झालेल्या पावसामुळे मैदान अजून खेळण्यासाठी योग्य झालं नसल्यामुळे मॅच सुरू व्हायला उशीर होणार आहे.
पहिल्या टी-20मध्ये भारताचा विजय झाल्यावर दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं जोरदार कमबॅक करत मॅच जिंकली. ३ टी-20ची ही सीरिज १-१नं बरोबरीत असल्यामुळे हैदराबादच्या मॅचमध्ये दोन्ही टीम सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरतील.
भारत जर आजचा सामना जिंकली तर ७० वर्षात जे झाले नाही ते पहिल्यांदाच होईल. भारताने ऑस्ट्रेलियासोबत खेळलेल्या याआधीच्या तिन्ही सीरिजमध्ये लागोपाठ विजय मिळवला. २०१६ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच होमग्राऊंडवर टी-२० सीरिजमध्ये ३-० ने मात दिली होती. त्यानंतर त्याच वर्षी भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये २-१ ने भारताने विजय मिळवला होता. तसेच नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाने कागांरूंना ४-१ ने मात देत सीरिज आपल्या नावावर केली.
आजचा सामना विराट सेनेने जिंकला तर आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठा फरक बघायला मिलेल. आयसीसी टी-२० रॅंकिंगमध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. जर भारत तिसरा टी-२० सामना जिंकेल तर टीम इंडियाच्या रॅंकिंगमध्ये काहीच फरक पडणार नाही. पण ऑस्ट्रेलिया जिंकली तर टीम इंडिया पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर येईल.