मुंबई : महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यपाल यांनी राजभवनाबाहेर येऊन राजकारण करावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. याला विरोधीपक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्र्यांना भेटण्यापेक्षा राज्यपालांकडे लोक का जातात याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावे. राज ठाकरे यांनी देखील सांगितलं की सरकारकडून काही होताना दिसत नाही.'
'सरकारकडून काही होत नाही त्यामुळे घटनात्मक पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या राज्यपालांकडे जनता न्याय मागण्यासाठी जाऊ शकते. पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत त्यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. शिवसेना मूळ प्रश्नांवर बगल देण्यासाठी रोज असे नवीन फंडे आणते आहे.' असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
मराठा-ओबीसी असा वाद झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल. सर्व समाजाचे हक्क अबाधित ठेवून एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. संजय राऊत यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.