ओव्हल : ओव्हलच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली वॉर्मअप मॅच सुरु आहे. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर भारताचा स्पिनर आर. अश्विन याने कमबॅक केलंय.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण काहीतरी नवे करणार असे अश्विन म्हटला होता. त्यानुसार न्यूझीलंडविरुद्धच्या सुरु असलेल्या मॅचमध्ये अश्विनचा नवा अंदाज पाहायला मिळाला.
२२वी ओव्हर टाकताना त्याने नवा प्रयोग केला. ग्रँडहोमला दुसरा बॉल त्याने शॉर्ट लेगब्रेक टाकला. याच ओव्हरमधील चौथ्या बॉललाही त्याने हाच प्रयोग केला. मिल्नेला बॉल टाकतानाही त्याने हीच ट्रिक वापरली. दिवसातला हा त्याचा तिसरा लेगब्रेक ठरला.