Rhea Bullos Inspirational Story: आपल्या आजुबाजूला तुम्ही अनेक जणांना अपयशाची कारणे देताना पाहिले असेल. अमुक तमूक झाले म्हणून मी नाही करु शकलो, ते झालं नसत तर आज मी खूप पेसैवाला, प्रसिद्ध झालो असतो..वैगेरे वैगरे...पण यश मिळावयचं तुम्ही एकदा मनाशी पक्क केल तर कारण त्याच्या आड येत नाहीत. धावपट्टू रियाची कहाणी म्हणजे कारणे देणाऱ्या अनेकांसाठी चपराक आहे. तर आयुष्यात काही तरी करु इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणा आहे.
एक 11 वर्षाची मुलगी. जिला धावण्याची आवड होती. नुसती आवडच नाही तर ती ऑलम्पिकमध्ये पोहोचली होती. जिची आर्थिक परिस्थिती अगदीच जेमतेम. जिच्या वडिलांकडे शूज घेण्यासाठीही पैसे नाहीत. पण या मुलीने मनाशी पक्क केलं की आपल्याला धावायचंय आणि जिंकायचं. मग एक नव्हे तर 3 मेडल तिला मिळाले. पण हे कसं शक्य झालं? कोण आहे ती मुलगी? सविस्तर जाणून घेऊया.
रिया बुलोस असे या मुलीचे नाव असून ती 2019 च्या ऑलिम्पिक स्पर्धेवेळी 11 वर्षांची होती. या स्पर्धेत पायावर पट्टी बांधून शर्यत पळाली. तिने एक नाही, दोन नाही तर तीन सुवर्णपदके जिंकली. 2019 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत फिलिपाइन्समधून रिया बुलोस नावाच्या 11 वर्षीय मुलीने जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडले. बुटांच्या ऐवजी पट्टी बांधून तिने 3 सुवर्णपदके जिंकली होती.
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, रियाने तिच्या वडिलांकडे शूज मागितले होते. पण त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी नव्हती की ते शूज घेऊ शकतील. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये उतरेपर्यंत तिला शूज काही मिळाले नाहीत. रिया बुलोसने पायात शूजऐवजी पट्टी बांधला होता. त्यावर त्यांनी मार्करने 'NIKE' असे लिहिले होते आणि कंपनीचा लोगोही बनवला होता. तिने कोणतीही तक्रार न करता आहे त्या परिस्थिती जुळवून घेतले होते. तिच्या पायावर पट्टी होती पण ती शूज समजून जोशात धावत होती. ती धावली. तिने अनेक स्पर्धकांना मागे टाकलं. तिच्या सोबत धावणाऱ्या अनेक स्पर्धकांच्या बुटांची किंमत लाखोमध्ये होती. पण रियाच्या मनातील जिद्द तिच्या पायातील 'शूज' पेक्षा कैकपट होती. रियाने 400 मीटर, 800 मीटर आणि 1500 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
रिया बुलोस 12 खेळाडूंच्या संघातील एक खेळाडूंपैकी एक होती. जिने परिस्थितीशी जुळवून घेत स्वतःचे बूट बनवले. फिलिपाइन्सच्या इलोइलो शहरात झालेल्या स्पर्धेत रियाच्या 12 खेळाडूंच्या संघात केवळ 2 जोड्यांच्या शूज होत्या. त्यामुळे तिला शूजशिवाय धावणे भाग पडल्याचे सांगण्यात आले.
रियाने या स्पर्धेच्या एक महिना अगोदरच ॲथलेटिक्समध्ये भाग घेणे सुरू केले होते. तिने 3 सुवर्णपदके जिंकून आपले कौशल्य दाखवून दिले असून चपलांची जोडी मिळाल्यास ती ॲथलेटिक्सच्या जगात खूप नाव कमवू शकते, अशी प्रतिक्रिया रियाच्या ट्रेनरने दिली होती.
त्यावेळी असादेखील दावा करण्यात आला होता की, NIKE कंपनीने 11 वर्षीय रियाविरुद्ध कॉपीराइट केस दाखल केली होती. पण नंतर हे सर्व दावे खोटे असल्याचे उघड झाले. फोटो व्हायरल झाल्यानंतर, फिलिपिन्समधील 'NIKE' शाखेने रिया बुलोसला 4 जोड शूज, एक बॅग आणि कपडे भेट दिल्याची माहिती माध्यमांतून समोर आली होती.