मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत सध्या उत्तम विकेटकीपर फलंदाजांपैकी एक आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिटायर झाल्यानंतर पंत सारखा चांगला दुसरा विकेटकीपर भारताला सापडला नाही. मात्र पंतप्रमाणे इतरंही टीम इंडियात विकेटकीपर आहेत ज्यांना संधी दिल्यास ते चांगली खेळी करू शकतात. केवळ ऋषभ पंतमुळे त्यांच्या करियरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ईशन किशन एक चांगला तरूण फलंदाज आहे. आयपीएल 2020 मध्ये 14 सामन्यांत त्याने 57 च्या सरसरीने 516 रन्स केले. 2021 मध्येही त्याची कामगिरी मोलाची ठरली. यानंतर त्याला टी-20 मध्येही स्थान देण्यात आलं. मात्र आता ऋषभ पंत टीममध्ये असताना भारतासाठी ईशान किशनला संधी मिळणं कठीण आहे.
संजू सॅमसन एक उत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. तरूण वयातच त्याने आयपीएलमध्ये तीन शकतं नोंदवली आहेत. मात्र ऋषभ पंतचा फॉर्म पाहता संजू सॅमसनला टीममध्ये संधी मिळत नाही. संजूने भारतासाठी आतापर्यंत 10 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये एका वनडे सामन्याचाही समावेश आहे. जर पंत अशाच फॉर्ममध्ये राहिला तर संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.
आंध्र प्रदेशचा विकेटकीपर फलंदाज केएस भरतने 69 फर्स्ट क्लास सामन्यात 37.58 च्या सरासरीने 3000 हून अधिक रन्स केले आहेत. यामध्ये 8 शकतं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 2021 मध्ये तो आरसीबीच्या ताफ्यात होता. आयपीएलमधल्या खेळीने त्याने भारताच्या टेस्ट टीममध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र ऋषभ पंतमुळे त्याला पुन्हा संधी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.