मुंबई : आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी जिंकणारी टीम मुंबई यंदाच्या हंगामात मात्र अत्यंत वाईट कामगिरी करताना दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबई टीमने पुन्हा चाहत्यांची निराशा केली. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई टीमचा 52 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आहे.
कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं. तर वेगवान बॉलर्स जसप्रीत बुमराहचं तोंडभरुन कौतुक केलं. आयपीएलमध्ये प्लेऑफची स्वप्नही दूर राहिली आहेत. यंदा मुंबई टीमने मोठी निराशा केली आहे.
मॅचनंतर रोहित शर्माचं मोठं विधान
फलंदाज चांगली कामगिरी करण्यात कमी पडले. त्यामुळे मी खूप निराश आहे. स्पर्धात्मक धावसंख्या असूनही ती गाठता आली नाही. टीमने अत्यंत वाईट कामगिरी केली आहे.
डी वाय पाटीलची खेळपट्टी आम्हाला माहीत होती मात्र त्याचा फायदा आम्ही घेऊ शकलो नाही. आम्ही आज उत्तम खेळू शकलो नाही याची खंत आहे. फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत याचा राग आणि दु:खही आहे.
जसप्रीत बुमराहचं कौतुक रोहित शर्माने केलं आहे. त्याने 10 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या. आतापर्यंतच्या सामन्यात बुमराहची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरावं लागलं. कोलकाताने 9 गडी गमावून 165 धावा केल्या. तर मुंबई टीमने 113 धावा केल्या आहेत. किशनशिवाय मुंबईच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. नाइट रायडर्सकडून सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी 43 धावा केल्या.