Rohit sharma : विराटशी पंगा पण रोहितने घेतला बदला, नवीन उल हकला दाखवल्या रात्रीच्या चांदण्या; पाहा Video

Rohit sharma, India vs Afghanistan : अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन उल हकला (Naveen-ul-Haq) रात्रीच्या चांदण्या दाखवल्या.

Updated: Oct 11, 2023, 09:09 PM IST
Rohit sharma : विराटशी पंगा पण रोहितने घेतला बदला, नवीन उल हकला दाखवल्या रात्रीच्या चांदण्या; पाहा Video title=
Rohit sharma to Naveen-ul-Haq

Rohit sharma to Naveen-ul-Haq : भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत शतक (Rohit sharma Century) झळकावलं. या सामन्यात रोहित शर्माने अनेक रेकॉर्डची मोडतोड केलीये. रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup) सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड (Rohit sharma Record) देखील रोहितच्या नावावर झाला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकत सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड नावावर केलाय. या मॅचमध्ये रोहित शर्माने विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन उल हकला रात्रीच्या चांदण्या दाखवल्या.

सलामीला आलेल्या रोहितने सुरूवातीपासून आक्रमक अंदाजात सुरूवात केली. पहिल्या ओव्हरपासून त्याने बॉलर्सवर आघात करण्यास चालू केलं. फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान यांना पहिल्या पॉवरप्लेमध्ये चोप दिला. त्यावेळी रोहितने नवीन-उल-हक तीन खणखणीत फोर अन् दोन सिक्स खेचले. या सामन्यात रोहितने 16 फोर अन् 5 सिक्स खेचले. 

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.