Rohit sharma : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना खेळवण्यात येतोय. यामध्ये टीम इंडियाला ( Team India ) हा फायनल सामना जिंकण्यासाठी 444 रन्सचं आव्हान देण्यात आलंय. हे आव्हान स्विकारण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली असून शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) विकेटवरून नवा वाद उपस्थित होताना दिसला. यावेळी गिल आऊट होता की नॉट आऊट यावर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. अशातच गिलला आऊट दिलेलं पाहताच रोहित शर्माचं रिएक्शन व्हायरल होतंय.
टीम इंडिया दुसऱ्यांदा फलंदाजीला आल्यनंतर शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) रूपाने मोठा धक्का बसला. त्याच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियावर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलीये. शुभमन गिल ( Shubman Gill ) चांगल्या लयीत दिसत होता, मात्र यावेळी 18 रन्सवर तो कॅच आऊट झाला. मात्र या कॅचवरून मोठा गदारोळ माजला आहे.
स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ग्रीनने त्याचा कॅच घेतला. पण हा कॅच होता की नाही, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. मुळात झेल घेतल्यानंतर बॉल जमिनीला स्पर्श होतोय, याबाबत पुरेसे पुरावे न मिळाल्याने अंपायरने गिलला आऊट करार दिला. दुसरीकडे बॉल जमिनीला स्पर्श करत असल्याचं दिसून येतंय.
दरम्यान रिप्ले पाहिल्यानंतर शुभमन गिल नॉट आऊट आहे, असा पाहणाऱ्यांचा समज झाला. यावेळी क्रिझवर शुभमन गिल आणि रोहित शर्मा ( Rohit sharma ) देखील स्क्रिनकडे पाहत उभे होते. मात्र हा निर्णय गिलच्या विरोधात गेला आणि रोहित शर्माची ( Rohit sharma ) रिएक्शन व्हायरल झाली. रोहितच्या या रिएक्शनवरून त्याला हा निर्णय पटला नसल्याचं दिसून आलं. गिलला आऊट दिल्याचं पाहताच रोहित जोरात 'नो' अस ओरडताना दिसतोय.
Rohit Sharma reaction #WTCFinal #WTC23Final pic.twitter.com/GwckvmX4KW
— आदित्य पंडीत (@AdityaP23166892) June 10, 2023
दरम्यान शुभमनच्या या विकेटवरून वाद निर्माण होताना दिसतोय. शुभमन गिलच्या जागी स्टीव्ह स्मिथ असता तर अंपायरने नॉट आऊट म्हणून दिलं असतं, अशी टीका रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री करताना दिलीये. याशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय.