Rohit Sharma चं वाढतं वजन टीम इंडियासाठी डोकेदुखी? हिटमॅनच्या खराब फिल्डिंगमुळे पुन्हा फिटनेसवर प्रश्नचिन्ह

किवी फलंदाजाने एक शॉट मारला होता. कॉन्वेने मारलेला हा शॉट रोखण्यासाठी रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Jan 24, 2023, 09:16 PM IST
Rohit Sharma चं वाढतं वजन टीम इंडियासाठी डोकेदुखी? हिटमॅनच्या खराब फिल्डिंगमुळे पुन्हा फिटनेसवर प्रश्नचिन्ह title=

Rohit Sharma misfield : 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार (Rohit Sharma) ने तुफान खेळी करत शतक झळकावलं. तब्बल 3 वर्षानंतर वनडेमध्ये शतक झळकावल्यानो रोहिते चाहते देखील फार खूश आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने (Shubman Gill) टीम इंडियाला एक चांगली सुरुवात करून दिली. भारताने किवींसमोर (I) 386 रन्सचं मोठं आव्हान ठेवलं होतं. मात्र फलंदाजी कोणतीच कसर न सोडणारा रोहित फिल्डींगमध्ये काहीसा सुस्त दिसून आला. 

झालं असं की, किवी फलंदाजाने एक शॉट मारला होता. कॉन्वेने मारलेला हा शॉट रोखण्यासाठी रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Rohit Sharma चा खराब फिटनेस टीमसाठी धोकादायक

टीम इंडियाने दिलेलं 386 रन्सचं आव्हान पूर्ण करण्यासाठी किवी फलंदाज मैदानावर उतरले होते. मात्र आजच्या सामन्यात रोहित शर्मा फिल्डींगमध्ये काही उत्तम कामगिरी करू शकला नाही.  किवींच्या 15 व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवने ड्वेन कॉन्वेला बॉल टाकला. कॉन्वेने मिड-विकेटमध्ये शॉट मारला. 

यावेळी हिटमॅनला तो शॉट अडवण्याची संधी होती, मात्र तो बॉल अडवू शकला नाही. रोहितने केलेल्या मिसफिल्डमुळे किवींना 2 रन्स मिळाले. मुख्य म्हणजे रोहितकडून मिसफिल्ड होण्याची ती काही पहिलीच वेळ नव्हती.

टीम इंडियाचा न्यूझीलंडला क्लिन स्विप

आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया पास झाल्याचं पहायला मिळतंय. प्रथम श्रीलंका दहन केलं. त्यानंतर आता किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि सीरिजमध्ये 3-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे.

कर्णधाराची तुफान खेळी

रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.

तब्बल 3 वर्षानंतर रोहितचं शतक

रोहित शर्माने त्याचं शेवटचं वनडे शतक 2020 मध्ये ठोकलं होतं. त्याने त्याचं हे शतक ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलं होतं. या सामन्यामध्ये रोहितने 119 रन्सची उत्तम खेळी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो खराब फॉर्मशी झुंजत असल्याचं दिसलं. अखेर त्याने 3 वर्षानंतर त्याचा शतकांचा दुष्काळ संपवला आहे.