राजस्थान विरुद्ध हैदराबाद काँटे की टक्कर, कोण ठरणार सरस

राजस्थान रॉयल्स विरुद्ध हैदराबाद आज सामना होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचवा सामना आहे. 

Updated: Mar 29, 2022, 04:09 PM IST
राजस्थान विरुद्ध हैदराबाद काँटे की टक्कर, कोण ठरणार सरस title=

पुणे : राजस्थान रॉयल्स विरुद्ध हैदराबाद आज सामना होणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचवा सामना आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार असून 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन तर हैदराबाद संघाचा कर्णधार संजू सॅमसन एकमेकांविरोधात उतरणार आहेत. हेड टू हेड सामन्यांवर नजर टाकायची झाली तर दोन्ही संघ आतापर्यंत 15 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. 

हैदराबाद संघाने 8 तर राजस्थान संघाने 7 सामने जिंकले आहेत. गेल्यावर्षी दोन्ही संघ प्ले ऑफपर्यंत पोहोचू शकले नाहीत. हैदराबादमध्ये अंतर्गत कलहाने टीमची वाट लागली. तर राजस्थानमध्ये गेल्या हंगामात अनेक खेळाडू सोडून गेले. 

यंदा दोन्ही संघ नव्या जोमात मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे यावेळी दोन्ही संघ दमदार कामगिरी करतील अशी अशा आहे. राजस्थान संघातून पडिक्कल आणि बटलर ओपनिंगसाठी उतरू शकतात. मिडल ऑर्डरमध्ये  यशस्‍वी जायसवाल, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर आणि रियान पराग खेळण्याची शक्यता आहे. 

ऑलराऊंडर्स म्हणून राजस्थानकडे जेम्‍स नीशम आणि रविचंद्रन अश्विन तर गोलंदाजांमध्ये  युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्‍ट आणि प्रसिद्ध कृष्‍णा तगडे बॉलर्स आहेत. त्यामुळे आता हैदराबादच्या धडाकेबाज फलंदाजांना राजस्थान कसं रोखणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.