मुंबई : युवकांसाठी त्यांचे आवडते क्रिकेटर्स त्यांचे आयकॉन आहेत, क्रिकेटच्या मैदानातील फटक्यांवर जशी त्यांची नजर असते, तसेच त्यांच्या स्टाईलचंही त्यांना आकर्षण असतं. यात सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देवता देखील म्हटलं जातं. आपले आवडते क्रिकेटर्स कोणत्या ब्रॅण्डची उत्पादनं वापरतात, याचं देखील आकर्षण सर्वांना असतं, कोणता क्रिकेटर कोणत्या ब्रॅण्डची वस्तू वापरतो, यावर ब्रॅण्डची प्रतिमा प्रभावी ठरते आणि ब्रॅण्डची किंमत वाढते. तर आपण या संपूर्ण रिपोर्टमध्ये पाहु या टीम इंडियाचे लोकप्रिय खेळाडू कोण कोणते ब्रॅण्डचे मोबाईल फोन वापरतात.
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन महेंन्द्रसिंग धोनीची फॅन फॉलोईंग सर्वात जास्त आहे, फक्त भारतातचं नाही, तर संपूर्ण जगात फॅन त्याला फॉलो करतात. धोनी लावा मोबाईलला एन्ड़ोर्स करतो. धोनीमुळे लावा मोबाईलला भारतात चांगली ओळख मिळाली आहे, असं म्हणता येईल. पण दुसरीकडे अशी सोशल मीडियावर चर्चा आहे की, धोनी हा अॅप्पल ७ प्लस आयफोन वापरतो. धोनीविषयी असं देखील सांगतात की, त्याला ब्लॅकबेरी फोन खूप आवडत होता. धोनीला २०१७ मध्ये ब्लॅकबेरी फोन वापरतानाही पाहण्यात आलं होतं.
टीम इंडियाचा विराट कोहली युवकांच्या गळ्याचा ताईत आहे. विराट कोहलीच्या हातात अनेक वेळा आयफोन एक्स दिसून आला होता. ज्यात अपेक्षा केली जात आहे की, काही भारतीय स्टार प्लेअर आपल्या व्यक्तीगत आयुष्यात आयफोन एक्सचा वापर करतात. विराट कोहलीला या आधी २०१७ साली ब्लॅकबेरी फोन वापरताना पाहण्यात आलं होतं.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला म्हणतात, फक्त क्रिकेटचं मैदानच नाही, तर खऱ्या खुऱ्या आयुष्यात देखील लोक सचिनकडून प्रेरणा घेत, त्याला हिरो मानतात. सचिन स्मार्टट्रॉन कंपनीचा ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे. मात्र सचिनला अॅप्पल आयफोन ७ आवडतो असं म्हटलं जातं, काही दिवसांपूर्वी सचिनचा आवडता ब्रॅण्ड अॅपल असल्याचं म्हटलं जात होतं.
टी20 वर्ल्ड कपमध्ये ६ चेंडूत ६ षटकार लगावणारा, युवराज सिंह स्टाईल आयकॉन आहे. युवराज सिंह हा २०१७ साली ओप्पो मोबाईलचा ब्रॅण्ड अम्बेसेडर होता. ओप्पो F1 Plus लॉन्च झाला तेव्हा युवराज सिंह हा पहिला स्पोर्टस ब्रॅण्ड अम्बेसेडर होता. अनेक वेळा बातम्या आल्या होत्या, की युवराज सिंह आपल्या खासगी आयुष्यात ओप्पोचा स्मार्ट फोन वापरतो. ओप्पोशिवाय युवराज सिंहचा पसंतीला आलेला फोन आयफोन 7 Plus आहे.