लंडन : शिखर धवनचं शतक तसंच रोहित शर्मा आणि धोनीच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं ३२१ रन्स केल्या. धोनीनं त्याच्या नेहमीच्याच अंदाजामध्ये फटकेबाजी करत ५२ बॉल्समध्ये ६३ रन्स केल्या. धोनीच्या या खेळीमध्ये सात फोर आणि चार सिक्सचा समावेश आहे.
धोनीची ही फटकेबाजी स्टेडियममधून प्रेक्षकही एन्जॉय करत होते. बाहुबलीच्या पोस्टरवर धोनीचा फोटो लावून प्रेक्षक धोनीला सपोर्ट करत होते. धोनी हा भारतात आणि भारताबाहेर सर्वात जास्त सिक्स मारणारा भारतीय क्रिकेटपटू आहे.
धोनीनं २८८ वनडेच्या २५० इनिंगमध्ये २०६ सिक्स मारल्या आहेत. सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर आहे. आफ्रिदीनं ३५१ सिक्स मारल्या आहेत तर २७० सिक्स मारणारा सनथ जयसूर्या दुसऱ्या, २३८ सिक्स मारणारा क्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.
#Dhoni That Six by Dhoni #IndvSL #Dhoni pic.twitter.com/Jt9eaGErGJ
— SD (@SomjitDey) June 8, 2017
This Is #Dhoni Craze
Billions of Heart Beat is This Man
Real Bahubali of Cricket #INDvSL King
Rt If You Enjoyed his Inning pic.twitter.com/mzybC5Yxzq— Dhoni Headquarter (@AD_Devil_7) June 8, 2017