Asian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का

Indian Team: भारतीय क्रिकेट चाहते एशिया कप 2023 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्यााधी क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 

Updated: Jun 24, 2023, 03:35 PM IST
Asian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का title=

India in U-17 Asian Cup : एशिया कप क्रिकेट स्पर्धेचं (Asia Cup 2023) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार असून पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकेत (Sri Lanka) आयोजन करण्यात आलं आहे. 31 ऑगस्टला सुरु होणारी या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होईल. करोडो क्रिकेट प्रेमी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्याआधी भारतीय क्रीडा प्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आहे. 

भारतीय क्रीडा प्रेमींना धक्का
एएफसी अंडर-17 एशियाई कप फुटबॉल स्पर्धेत (AFC U-17 Asian Cup) भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे.  ग्रुप डीमध्ये करो या मरोच्या सामन्यात भारतचा सामना बलाढ्य जपान (India vs Japan) संघांशी होता. पण या सामन्यात जपानने भारतावर 4-8 अशी माीत केली. या पराभवामुळे भारतीय फुटबॉल संघ एशिया कप फुटबॉल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याासठी भारतीय संघाला हा सामना जिंकावाच लागणार होता.  

लाजीरवाणा पराभव
बलाढ्य जपानसमोर भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी झाली. जपानने भारताविरोधात तब्बल 8 गोल केले. तर भारतीय संघाला 4 गोल करता आले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जपानने वर्चस्व राखल होतं. पहिल्याच हाफमध्ये जपानने चार गोल केले. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 

भारताकडून 47 मिनिटाला मुकुल पंवार याने पहिला गोल केला. तर डॅनी मेतेईने 62 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर 69 आणि 79 व्या मिनिटाला तिसरा आणि चौथा गोल झाला. पण त्याआधी जपानने आठ गोल केले होते. भारताला जपानची बरोबर करता आली नाही. आता क्वार्टर फायनलमधअये जपानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 26 जूनाल पथुम थामी स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. 

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा
त्याआधी तीन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या फुटबॉल स्पर्धेत बारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. साउथ एशियाई फुटबॉल महासंघ कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा तब्बल 4-0 असा पराभव केला. भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने तब्बल 3 गोल केले. भारताच्या उदंता सिंह कुममने 81 व्या मिनिटाला चौथा गोल करत पाकिस्तानला परतीचे मार्गच बंद करुन टाकले.