Ricky Ponting spring bat : 2023 च्या वनडे वर्ल्डकपपूर्वी 2003 चा ही वर्ल्डकप टीम इंडियाने गमावला होता. त्यावेळीही रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या अजूनही हा सामना लक्षात असेल. टीम इंडिया 2003 चा वर्ल्डकप हरल्यानंतर मोठ्या प्रमाणात एक अफवा पसरली होती. ही अफवा होती ती म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती, ज्यामुळे त्यांनी चांगला खेळ केला आणि भारताकडून वर्ल्डकप हिरावून घेतला. यावर आता रिकी पॉटिंगने मोठं विधान केलं आहे.
रिकी पॉटिंगवर 2003 च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध स्प्रिंग बॅट वापरल्याचा आरोप होता. त्या अंतिम सामन्यात पाँटिंगने 140 रन्सची नाबाद खेळी खेळली. ज्यामध्ये ज्यात 8 सिक्सेचा समावेश होता. त्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने 359 रन्स केले होते. यावेळी भारतातील लोकांचं असं म्हणणं होतं की, पॉटिंग स्प्रिंगच्या मदतीने इतके चांगले शॉट्स खेळू शकला. ही अफवा 20 वर्षांनंतही काही लोकांच्या मनात आहे. दरम्यान खरंच असं होतं का याचा एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश झालाय.
सध्या आयपीएल सुरु आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक कंटेट क्रिएटर रिकी पॉटिंगचं स्टिंग ऑपरेशन करताना दिसतोय. यावेळी हा कटेंट क्रिएटर 2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये पॉटिंगच्या बॅटमध्ये खरोखर स्प्रिंग होती का, असा प्रश्न विचारतोय. यावेळी पॉटिंग त्याच्या हातांचे मसल्स दाखलतो आणि म्हणतो, “नाही, माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग नव्हती.”
| (Khulasa!) Har 90s kid ke school ki sabse badi Afwaah ka (parda-phaash)@SatishRay_ pic.twitter.com/k72ekbNCdY
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 26, 2024
त्यानंतर पॉटिंगने बॅटमध्ये स्प्रिंग कशी असू शकते याबाबत माहिती दिलीये. ती स्प्रिंग बॅटच्या हँडलमध्ये असते का? की बॅटच्या एंडला असते? मी त्याबद्दल कधीच ऐकलं नाही. हे सर्व फक्त भारतातच मानलं जातं. ऑस्ट्रेलियामध्ये कोणीही असं मानत नाही की, खेळाडूंच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती.
2003 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 125 रन्सने पराभव केला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने विक्रमी चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 359 रन्स केले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 234 रन्सचं करता आले. त्यावेळी ग्लेन मॅक्ग्राने 3 तर ब्रेट ली आणि अँड्र्यू सायमंड्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.