Sri Lanka Cricket Announced squad : येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशात संयुक्तपणे टी-20 वर्ल्ड कप (ICC Mens T20 World Cup 2024) खेळवला जाणार आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka squad) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची यादी जाहीर केली अन् वर्ल्ड कप स्कॉडची घोषणा केली. वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याच्या खांद्यावर श्रीलंका संघाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी असणार आहे. तर चारिथ असलंका याला व्हाईस कॅप्टन करण्यात आलंय. कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा या स्टार फलंदाजांना संधी देण्यात आली आहे.
अँजेलो मॅथ्यूजची संघात एन्ट्री
श्रीलंकेने स्टार ऑलराऊंडर अँजेलो मॅथ्यूज याला टी-ट्वेंटी संघात स्थान दिलंय. अँजेलो मॅथ्यूज तब्बल 3 वर्षानंतर टी-ट्वेंटी संघात परतला आहे. अँजेलो मॅथ्यूज याच्याकडे 6 टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव आहे. तर 2014 च्या विश्वविजेत्या संघाचा तो भाग देखील होता. स्वतः कर्णधार हसरंगा डुनिथ वेललागे, धनंजया डी सिल्वा आणि कामिंदू मेंडिस यांच्यासह फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मॅथ्यूज आणि शनाका या दोन ऑलराऊंडरला देखील संधी देण्यात आली आहे.
गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये मथीशा पाथिराना आणि नुवान तुषारा या दोन मलिंगा स्टाईल गोलंदाजांना स्कॉडमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मदुशंका गोलंदाजीमध्ये एक्स फॅक्टर ठरू शकतात. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ हे संघ गट ड मध्ये आहे. 3 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक मोहिमेची सुरुवात करतील. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला चांगलाच कस लागणार आहे.
Here's your Sri Lankan squad ready to roar at the ICC #T20WorldCup 2024 in the USA and Caribbean!
READ: https://t.co/9Zia3yVeVZ #LankanLions pic.twitter.com/ZresMKrIqg
— Sri Lanka Cricket (@OfficialSLC) May 9, 2024
श्रीलंकेचा संघ : वानिंदू हसरंगा (C), चारिथ असलंका (VC), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजया डी सिल्वा, महेश थेक्षाना, दुनीथ नुशमान वेललागेरा, दुनीथ नुशमान चॅलेरा, नुशमन चॅलेस मथीशा पाथीराना आणि दिलशान मदुशंका.
राखीव खेळाडू : असिथा फर्नांडो, विजयकांत व्यासकांत, भानुका राजपक्षे आणि जेनिथ लियानागे.