Sunil Gavaskar On Ranji Players salary : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) खेळायचं म्हटलं तर इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक चहर याच्यासह इतर खेळाडू नाक मुरडतात. पण आयपीएलमध्ये मात्र लगेच खेळण्यासाठी तयार होतात. अशातच बीसीसीआय (BCCI) देखील नाराज असल्याचं समोर आलं होतं. बीसीसीआयने अय्यर आणि इशानवर कारवाई केली होती. तर अनेक खेळाडूंनी रणजीला प्राधान्य द्यावं, असं मत व्यक्त केलं आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि लिटिल मास्टर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी बीसीसीआयला एक मोलाचा सल्ला दिला आहे. गावस्कर यांनी असा काही सल्ला दिलाय की, खेळाडूंची इच्छा नसताना देखील ते रणजीचे सामने सोडू शकणार नाहीत.
काय म्हणाले सुनील गावस्कर?
सुनिल गावस्कर यांनी रणजी खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. थोडका नाही तर दुप्पट किंवा तिप्पट पगार वाढवावा, असंही गावस्कर म्हणतात. बीसीसीआयद्वारे खेळाडूंना बक्षीस देणं ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु मी बोर्डाला विनंती करतो की, रणजी ट्रॉफी असलेल्या कसोटी संघाची काळजी घेतली जाईल, असे निर्णय घ्यावेत. जर रणजी ट्रॉफीची फी दुप्पट किंवा तिप्पट केली गेली तर, नक्कीच बरेच क्रिकेटपटू रणजी ट्रॉफी खेळतील आणि कमी खेळाडू रणजी खेळणं सोडतील, असं सुनिल गावस्कर म्हणाले आहेत.
क्रिकेट बोर्डाद्वारे जे खेळतील त्यांना बक्षीस द्या, परंतु मी बीसीसीआयला विनंती करतो की, रणजी ट्रॉफी असलेल्या कसोटी संघाची देखील काळजी घेतली जाईल. धर्मशाळा कसोटीनंतर जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा राहुल द्रविड काय म्हणाला, तो त्याला पुरस्कार म्हणू इच्छितो. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत रणजी ट्रॉफी आणि त्यानंतर व्हाईट बॉल टूर्नामेंट खेळवावं, हे माझे वैयक्तिक मत असल्याचं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
जानेवारीपासून एकदिवसीय सामने सुरू झाल्यामुळे, जे लोक आयपीएलमध्ये आहेत ते तेव्हापासून पुरेसा सराव करू शकतात, असं गणित सुनील गावस्कर यांनी मांडलं आहे. गेल्या वर्षी बीसीसीआयने रणजी ट्रॉफी विजेत्यांची बक्षीस रक्कम 5 कोटी रुपये केली होती. त्यानंतर आता मुंबईने बाजी मारली आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर मात करत रणजी ट्रॉफीवर (Ranji Cup 2024) नाव कोरलंय. 42 वेळा मुंबईने रणजीवर नाव कोरण्याचा पराक्रम केला आहे. बईने विदर्भासमोर (Vidarbha) 538 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण विजयाचा पाठलाग करणारा विदर्भाचा संघ 368 धावांवर गारद झाला. मुंबईने तब्बल 169 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणेने पुन्हा मुंबईची मान उंचावली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.