Suryakumar Yadav Century Reaction: आयपीएलच्या 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईचा 7 विकेट्सने विजय झाला. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. या सामन्यात सूर्याने सेंच्युरी झळकावली आणि मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्याच्या या तुफान खेळीनंतर माजी क्रिकेटरने त्याच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय. यावेळी सूर्या सर्वांपेक्षा वेगळा असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं म्हणणं आहे. अशातच सूर्याचा डीएनए सामान्य माणसापेक्षा वेगळा असल्याचा दावाही त्याने केला.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा वेगवाग गोलंदाज वेन पार्नेलने सूर्यकुमारला उद्देशून मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी सूर्यकुमारबाबत सोशल मीडियावर ट्विट केलं असून म्हटलंय की, कोणी कधी सूर्यकुमार यादवची DNA टेस्ट केली आहे का? तो एकदम वेगळा व्यक्ती आहे.
Has anyone ever done a DNA test on @surya_14kumar ? This guy is DIFFERENT, different.
— Wayne Parnell (@WayneParnell) May 6, 2024
हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्याने 51 चेंडूत 12 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने 102 रन्सची नाबाद खेळी केली. या काळात त्यांचा स्ट्राईक रेट 200 होता. या डावात सूर्याने त्याचे काही अनोखे शॉट्सही खेळले. सूर्या आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 143* रन्सची पार्टनरशिप केली. दोघांच्या या भागीदारीमुळे मुंबईला विजय मिळवता आला आहे. यावेळी सूर्याने शानदार फलंदाजी केली.
पीयूष चावलाची भेदक गोलंदाजी आणि सूर्याची खेळी यामुळे अखेर मुंबई इंडियन्सला यंदाच्या सिझनमधील चौथा विजय मिळवता आला. सलग चार पराभव स्विकारल्यानंतर वानखेडेच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादला 7 विकेट्सने पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना हैदाराबादच्या टीमने 173 रन्स केले. यावेळी हेडचे 48 रन्स आणि कमिन्सच्या 35 रन्सच्या खेळीसह 173 रन्स केले. यावेळी मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पियुष चावलाने सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या.
दुसरीकडे या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा आणि इशान किशन स्वस्तात माघारी परतले. तर नमन धीर एकही रन न करता माघारी परतला. मात्र एकटा सूर्याच हैदराबादच्या संघावर भारी पडला. यावेळी 51 बॉल्समध्ये सूर्याने दमदार शतकी खेळी केली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.