Suryakumar Yadav Team India: टीम इंडिया सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशाविरूद्ध टीम इंडियाला 2 टेस्ट सामने खेळायचे आहेत. यामध्ये पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. बांगलादेशाच्या या दौऱ्यावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीमचा हिस्सा नव्हता. न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्याला आराम देण्यात आला होता. अशातच आता सूर्यकुमारबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियामधून आराम दिल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक मोठा निर्णय घेतला आहे. गेले जवळपास 3 वर्ष न खेळलेल्या टूर्नामेंटमध्ये सूर्यकुमार सहभागी होणार आहे.
सध्या रणजी ट्रॉफी 2022-23 खेळली जातेय. याच रणजी ट्रॉफीमध्ये सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. सूर्या जवळपास गेल्या 3 वर्षांपासून रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी झाला नव्हता. सूर्यकुमार प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो.
मुंबईची टीम 20 डिसेंबरपासून हैदराबाद विरूद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने 17 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये सूर्यकुमार यादवच्या नावाचाही समावेश आहे.
2022 सालामध्ये सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरलाय. या वर्षामध्ये त्याने 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने तसंच 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1,164 रन्स केले आहेत. यामध्ये 9 अर्धशतकं आणि 2 शतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरलाय.
सूर्याने यावर्षी वनडेमध्ये 13 सामने खेळून 280 रन्स केले आहेत. दरम्यान सूर्याने अजूनही टीम इंडियासाठी एकही टेस्ट सामना खेळलेला नाही.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, यशस्वी जायसवाल, अरमान जाफर, सरफराज खान, सुवेद पारकर, हार्दिक तमोरे, प्रसाद पंवार, शम्स मुलानी, तनुश कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिद्धार्त राउत, रोयस्टन डायस, शशांक अतर्दे, मुशीर खान.