Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. सूर्याच्या य़ा खेळीने टीम इंडियाचा हा स्कोर 228 पर्यंत पोहोचला होता.
सूर्यकूमारने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्ध 112 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. हे त्याचे टी20 फॉरमॅटमधले तीसरे टी20 शतक होते. या आधी त्याने जूलै 2022 मध्ये इग्लंडविरूद्ध 117 धावा केल्या होत्या. हे त्याचे टी20तले पहिले शतक होते. तर दुसरे शतक त्याने न्यूझीलंड विरूद्ध नोव्हेंबरमध्ये ठोकले आहेत. यावेळी त्याने 111 धावांची नाबाद खेळी केली होती. आणि आता श्रीलंकेविरूद्ध तिसरे शतक ठोकले होते.
सूर्यकुमार यादवने (surykumar yadav Century)शतक ठोकून के एल राहूलचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कारण के एल राहूलच्या नावे टी20 2 शतक होती. आता सुर्याने तिसरे शतक ठोकून त्याचा रेकॉर्ड मोडलाय. तसेच रोहित शर्माच्या नावे टी20 त 4 शतके आहे. रोहितचा (Rohit Sharma) हा रेकॉर्ड आता सूर्यकूमार यादवला खुणावतोय. रोहितचा हा रेकॉर्ड लवकरच मोडला जाईल, असे देखील चाहत्यांना वाटतेय.
सूर्यकूमारने (surykumar yadav Century)शतक ठोकून टी20 त 1500 धावा पूर्ण केल्या आहेत. 834 बॉलमध्ये त्याने या धावा पुर्ण केल्या आहेत. मात्र तो सर्वात वेगवान 1500 धावा ठोकण्यात सहाव्या क्रमांकावर येतो. त्याने 43 सामन्यात 1500 धावा केल्या आहेत. तर त्याच्या आधी मोहम्मद रिझवानचा नंबर येतो. तर त्यावरील बाबर आझम, के एल राहूल, विराट कोहली आणि अॅरोन फिंच या सर्व खेळाडूंनी 39 सामन्यात 1500 धावा पुर्ण केल्या आहेत.
दरम्यान सूर्यकुमार यादव (surykumar yadav Century) टी20 फॉरमॅटमध्ये सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून समोर येत आहेत. त्याच्या बॅटींगची शैली दिग्गज खेळाडूंना देखील आवडते आहेत. सध्या त्याच्या या वेगवान शतकाची क्रिकेट वर्तूळात चर्चा आहे.