मुंबई: सागर धनखड हत्या प्रकरणी अखेर सुशील कुमारच्या मुस्क्या आवळण्यात स्पेशल सेलला यश मिळालं. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सागर धनखडची हत्या झाली त्या दिवशीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आता ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमार पुरता अडकला असून त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
सुशील कुमारने ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सांगितली त्यामध्ये चंदीगड आणि हरियाणातील साथीदारांचा सामावेश आहे. 4 मे रोजी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या दोन गटांमधील वादाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ सुशील कुमारच्या गटातील कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला होता. या व्हिडीओमध्ये सुशील कुमारच्या हातात काठी असल्य़ाचं दिसत आहे. या कठीने सुशील कुमार सागरला जबरदस्त मारहाण करत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुशील कुमारनं याबाबत मौन बाळगलं आहे. मात्र त्याने हत्या केली नाही असं चौकशीत तो पोलिसांना सांगत आहे.
हा व्हिडीओमध्ये सागर धनखड जखमी अवस्थेत खाली पडलेला दिसत आहे. तर सुशील कुमारच्या हातात काठी दिसत आहे. सुशीलसोबत त्याचे साथीदार देखील या सागरला मारहाण करत असल्याचं व्हिडीओमधून समोर आलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी अजय बक्करवालासह 7 लोकांना बेड्या ठोकल्या आहेत.