अफगाणिस्तानविरुद्ध नवीन टीम इंडिया सज्ज? संघात 2 मोठे बदल होण्याची शक्यता

टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानली जात होती, मात्र आता त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.

Updated: Nov 2, 2021, 03:36 PM IST
अफगाणिस्तानविरुद्ध नवीन टीम इंडिया सज्ज? संघात 2 मोठे बदल होण्याची शक्यता title=

दुबई : T20 विश्वचषक 2021 मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह सारख्या मोठ्या नावांसह आलेली टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. भारतीय क्रिकेट संघाची अशी अवस्था पाहून क्रिकेट प्रेमींना धक्काच बसला आहे. वर्ल्डकपसाठी टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानली जात होती, मात्र आता त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.

अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडला पराभूत करून अफगाणिस्तानविरुद्ध विजयाची नोंद करावी, अशी प्रार्थना आता भारताला करावी लागेल, परंतु असे असतानाही त्यांना रनरेटवरती देखील लक्ष ठेवावे लागेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्या 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता टी-20 विश्वचषक सामना रंगणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 2 मोठे बदल होऊ शकतात, जे पुढीलप्रमाणे आहेत.

1. वरुण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विन

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अश्विनच्या जागी वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आले होते, मात्र कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरला. वरुण चक्रवर्तीला दोन्ही सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला डिस्चार्ज मिळू शकतो आणि आर अश्विनला संधी मिळू शकते. टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला अद्याप वर्ल्डकपमध्ये संधी देण्यात आलेली नाही.

भारताचे माजी सिलेक्टर दिलीप वेंगसरकर म्हणाले की, अश्विनला पुन्हा का वगळले जात आहे? हा विचार करण्यासारखा विषय आहे. अश्विन हा प्रत्येक फॉरमॅटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. त्याने 600 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वात वरिष्ठ फिरकीपटू आहे. त्याची संघात निवड होऊन देखील त्याला संधी का मिळाली नाही हाच मोठा प्रश्न आहे.

२. मोहम्मद शमीच्या जागी राहुल चहर

मोहम्मद शमीचा संघ भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. या खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला सामना गमावून किंमत मोजावी लागली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला एकही विकेट मिळाली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला वगळले जाऊ शकते.

मोहम्मद शमीच्या जागी लेगस्पिनर राहुल चहरला संधी दिली जाऊ शकते. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तेवढा प्रभावी ठरत नाही, त्यामुळे लेगस्पिनर राहुल चहर जर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला तर फायदा होऊ शकतो. राहुल चहरची तगडी गोलंदाजी भारताला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून देऊ शकते.