India vs Pakistan T20 World Cup: करोडा क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबॉर्न क्रिकेट स्टेडिअमवर (Melbourne Cricket Ground) खेळला जाणार आहे. आता थोड्यात वेळात भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येतील. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) भारतीयंना विजयाचं दिवाळी गिफ्ट देण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा हा महामुकाबला मेलबर्नच्या मैदनावर भारतीय वेळेनुसार आज दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल. त्याआधी 1 वाजता नाणेफेक होईल. 2021 टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने पाकिस्तानचा 10 विकेटने पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करेल.
पराभवाचा वचपा काढणार
भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हा सामना पाहण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमी मेलबर्नमध्ये सकाळपासूनच जमले आहेत. तर टीव्हीवर सामना पाहण्यासाठी करोडो क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने पाकिस्तानकडून कधीच पराभव स्विकारला नव्हता. पण 2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर झाला. शाहिन शाह आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पराभव केला.
भारत-पाकिस्तान सामन्यावर क्रिकेट जगताचं लक्ष
भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. भारतीय टीममध्ये विराट कोहली, के एल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासारखे अनुभवी आणि एकहाती सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याची रणनिती टीम इंडिया आखू शकते. अशाच ऋषभ पंतला पुन्हा बेंचवर बसून सामना पाहावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय खेळाडूंना शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांचा सामना करावा लागणार आहे. भारताचे टॉपचे फलंदाज पॉवर प्लेमध्ये आफ्रिदीचा सामना कसा करतात यावर भारतीय संघाची धावसंख्या अवलंबून आहे.
सूर्यकूमार यादव फॉर्मात
भारतीयांच लक्ष असेल ते सूर्यकुमार यादववर. गेल्या काही सामन्यांपासून सुर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्मात आहे. मैदानावर चौफेर फलंदाजी करण्यासाठी सूर्यकुमार यादव ओळखला जातो. दरम्यान पावसामुळे टॉसही महत्त्वाचा ठरणार आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेण्यावर दोन्ही संघांचा भर असेल.
मेलबर्नवर 37 वर्षांनी भारत-पाक आमने सामने
मेलबर्न क्रिकेट मैदानावर तब्बल 37 वर्षांनी भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने सामने येणार आहे. याआधी 1985 मध्ये बेंसन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये या दोन संघात लढत झाली होती. कर्णधार म्हणून सुनील गावसकर यांचा हा शेवटचा सामना होता. या स्पर्धेत दमदार कामगिरी करत रवी शास्त्री यांनी ऑडी कार जिंकली होती.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक हुड्डा.
पाकिस्तानी संघ
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, शान मसूद, मोहम्मद नवाज, खुशदिल शाह, आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद, हारिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसीम, शादाब खान, मोहम्मद हसनैन