टीम इंडिया शेड्यूल बिझीच! टी-20 वर्ल्डकपनंतर जाणार 'या' दौऱ्यावर

टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीमध्ये गुंतली आहे

Updated: Jun 28, 2022, 12:34 PM IST
टीम इंडिया शेड्यूल बिझीच! टी-20 वर्ल्डकपनंतर जाणार 'या' दौऱ्यावर title=

मुंबई : टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीमध्ये गुंतली आहे. वर्ल्डकपमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश करावा यासाठी बीसीसीआय देखील विचार करतंय. दरम्यान टी-20 वर्ल्डकपनंतर देखील टीम इंडियाच्या खेळाडूंचं वेळापत्रक व्यस्तच राहणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 वर्ल्डकपनंतर टीम न्यूझीलंडविरोधात मैदानात 

टीम इंडियाच्या आगामी व्यस्त वेळापत्रकात आणखी एका दौऱ्याची भर पडलीये. ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकप पार पडल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडमध्ये वन-डे आणि टी-20 सामन्यांची सिरीज खेळवण्यात येईल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबद्दलची घोषणा केली आहे.

18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दोन्ही टीम्स 3 वन-डे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळतील. यानंतर 2023 च्या जानेवारी महिन्यात न्यूझीलंडची टीम मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येईल.

या सिरीजमधील टी-20 सामने वेलिंग्टन, तौरंगा आणि नेपियर याठिकाणी खेळवण्यात येणार आहे. तर वन-डे सामन्यांची सिरीज ऑकलंड, हॅमिल्टन आणि ख्राईस्टचर्चमध्ये खेळवण्यात येईल. नवीन वर्षात न्यूझीलंडची टीम पाकिस्तान आणि भारत दौरा आटोपून पुन्हा एकदा घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट सामन्यांची सिरीज खेळेल.