मुंबई : माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाला (Team India) आपल्या नेतृत्वात अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याने अनेकदा एकहाती विजय मिळवून दिला आहे. विराट कोहली अनेक महिन्यांपासून आऊट फॉर्म आहे. त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करताना सातत्याने संघर्ष करावा लागतोय. 'रनमशीन' (Run machine) अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बॅट्समनला धावांसाठी झगडावं लागतंय. (team india bastsman shreyas iyer has may be replace to virat kohli)
विराटला गेल्या 2 वर्षांमध्ये शतकही लगावता आलेलं नाही. मात्र आता टीममध्ये विराटच्या तोडीचा फलंदाज आला आहे. हा मुंबईकर (Mumbaikar Cricketer) खेळाडू विराटसाठी डोकेदुखी ठरु शकतो.
श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी (IND vs SL T 20 Series 2022 ) विराटला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी देण्यात आली. श्रेयसने श्रीलंका विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर खेळताना खोऱ्याने धावा कुटल्या.
श्रेयस सध्या फुल्ल फॉर्मात आहे. श्रेयसने लंका विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 मध्ये अनुक्रमे 52 आणि 74 धावांची अर्धशतकी खेळी केली.
श्रेयसच्या 74 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. श्रेयसला त्याच्या 74 धावांच्या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
श्रेयसमध्ये सामना एकहाती पालटण्याची क्षमता आहे. श्रेयसने विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 80 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे श्रेयस सातत्याने धावा करतोय.
श्रेयसच्या या कामगिरीमुळे आता विराटसमोर त्याचं स्थान कायम राखण्यासाठीचं आव्हान उभं राहिलंय, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. विराटला टीममधील स्थान कायम ठेवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागेल.