पीचची काहीही चूक नाही...; पीचवरून माजी खेळाडूंनी केलेल्या टीकेला Rohit Sharma चं प्रत्युत्तर

रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, यामध्ये पीचची कोणतीही चूक नाहीये. अशा स्थितीतमध्ये फलंदाजांनाच पीचवर रन कसे करावे यासाठी मार्ग शोधावा लागेल.

Updated: Mar 4, 2023, 04:03 PM IST
पीचची काहीही चूक नाही...; पीचवरून माजी खेळाडूंनी केलेल्या टीकेला Rohit Sharma चं प्रत्युत्तर title=

Rohit Sharma India vs Australia Test: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाने (Team India) 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान हे तिन्ही सामने तिसऱ्याच दिवशी संपल्याने भारतातील या पीचवर टीका करण्यात येतेय. असं असतानाही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय पीचना सपोर्ट केल्याचं दिसतंय. 

रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, यामध्ये पीचची कोणतीही चूक नाहीये. अशा स्थितीतमध्ये फलंदाजांनाच पीचवर रन कसे करावे यासाठी मार्ग शोधावा लागेल.

रोहित शर्माचा भारतीय पीचना सपोर्ट

पीचबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, अशी खेळपट्टी ही टीमची ताकद असते. त्यामुळे संघर्ष करणाऱ्या फलंदाजांना त्यावर रन्स कसे करायचे यासाठी त्यांनाच मार्ग शोधावा लागेल. दरम्यान हिटमॅनच्या या वक्तव्याने त्याने भारतीय पीचना सपोर्ट केल्याचे संकेत दिलेत. 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने 9 विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये शेवटच्या टेस्ट सामन्यात स्पिनर गोलंदाजांचसाठी अनुकुल असलेल्या पीचवर खेळू इच्छितो. कर्णधाराच्या म्हणण्याप्रमाणे, अशा पीचवर टीम इंडियाने सगल 15 सिरीजमध्ये विजय मिळवला आहे.  

आम्ही सिरीज सुरु होण्यापूर्वी हे ठरवतो की, आम्हाला कोणत्या प्रकारच्या पीचवर खेळायचं आहे. त्यामुळे असा पीचवर खेळणं हा देखील आमचाच निर्णय होता. फलंदाजांवर आम्ही दबाव टाकतोय, असं मला वाटतं नाही. जिंकल्यानंतर आम्हाला आमच्या फलंदाजीबाबत विचारलं जात नाही, तर सर्वांना या गोष्टीचा आनंद होतो. 

आव्हान स्विकारायला आम्ही तयार- रोहित

आम्ही या पीचवर खेळण्याचा निर्णय घेतला. मुळात आम्हाला माहिती होतं की, आम्हाला आव्हान दिलं जाईल, आणि यासाठी आम्ही तयार आहोत, असंही रोहितने सांगितलं. 

माजी खेळाडूंनी देखील भारताच्या या पीचवरून टीका केली होती. यावेळी रोहित म्हणाला की, मला नाही वाटतं माजी खेळाडू या पद्धतीच्या पीचवर खेळले असतील. मात्र आम्हाला या पीचवर खेळायचं असून हीच आमची ताकद आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही घरी खेळत असता, तेव्हा तुम्ही तुमच्या ताकदीने खेळता. 

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमच्या कामगिरीपेक्षा भारतातील पीचचा मुद्दा अधिक गाजलेला दिसतोय. या सिरीजमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांमध्ये फलंदाजांसाठी फलंदाजी करणं फार कठीण काम असल्याचं दिसून आलं. तिसऱ्या टेस्टचा रिझल्ट हा हा पहिल्या दोन टेस्टप्रमाणे तिसऱ्या दिवशीच लागला. दरम्यान यानंतर ICC ने इंदूरच्या पीचवरून कडक कारवाई केलीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला 'खराब' असा करार दिला आहे.

ICC ने ठोठावला दंड

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आलेला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सामना तिसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्स राखून पराभव केलाय. आयसीसीने दिलेल्या खराब रेटिंगमुळे इंदूरच्या होळकर स्टेडियमला 3 डिमेरिट्स पॉइंट देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे पुढील पाच वर्ष एक्विव्ह राहणार आहेत.