WPL vs IPL Rules : इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना मुंबई (Mumbai indians) आणि गुजरातमध्ये (Gujarat titans) होणार आहे. 5 संघाची ही स्पर्धा 22 दिवस होणार आहे. ता अंबानी यांचा मुंबई संघाच्या कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौरकडे आहे. या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. मुंबईच्या फ्रेंचायझीने Harmanpreet Kaur ला 1.80 कोटी रूपये खर्च करून आपल्या ताफ्यात घेतलं. WPL 2023 संपल्यानंतर चार दिवसांनी IPL 2023 चा बिगुल वाजणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, IPL पेक्षा WPL स्पर्धा जरा हटके आहे ते...कसं ते जाणून घेऊयात. (WPL 2023 vs IPL 2023 Womens Premier League mumbai indians vs gujarat titans in marathi)
नियम क्रमांक 1
IPL 2023 मध्ये 'इम्पॅक्ट प्लेयर' असणार आहे. याचा अर्थ सामना सुरु असताना एखादा खेळाडू बदलू शकतात. जसा फुटबॉल, हॉकीमध्ये बदलला जातो तसा..पण हा नियम WPL मध्ये लागू नसणार आहेत.
नियम क्रमांक 2
आयपीएलमधील संघांना प्लेइंग-11 मध्ये 4 परदेशी खेळाडूंना खेळवू शकतात. हाच नियम डब्ल्यूपीएलमध्येही आहे. पण जर एखाद्या संघात सहयोगी देशाचा खेळाडू असेल तर त्याला खेळवलं जाऊ शकतं. मग या नियमाचा विचार केल्यास डब्ल्यूपीएलमधील 5 संघापैकी फक्त एकाच संघाकडे सहयोगी देशाचे खेळाडू आहेत. अशात दिल्ली कॅपिटल्स हा संघ 5 विदेशी खेळाडूंसह खेळू शकतो.
नियम क्रमांक 3
WPL च्या 5 संघांमध्ये प्रत्येक संघाला 8 सामने खेळावे लागणार आहेत. तर आयपीएलच्या 10 संघांपैकी प्रत्येक संघ इतर 5 संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील म्हणजे एकूण 14 सामने त्यांना खेळावे लागतील.
नियम क्रमांक 4
आयपीएलमधील लीग स्टेजनंतर पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघांना प्लेऑफची संधी मिळणार आहे. तर WPL मधील लीगमध्ये पॉइंट टेबलमधील टॉपवर असणारा अंतिम फेरीमध्ये जाईल. तर अंतिम सामन्याच्या दुसऱ्या संघाला आणि तिसऱ्या संघाला मॅच खेळावी लागेल. त्यातील विजेता हा अंतिम फेरीत जाईल.