मुंबई : आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, कारण ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. आता सर्वांच्या नजरा 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या IPL मेगा लिलावाकडे लागल्या आहेत, जगातील स्फोटक खेळाडूंपैकी एक असलेल्या बेन स्टोक्सने IPL मेगा लिलावात आपले नाव का दिले नाही हे सांगितले आहे. बेन स्टोक्स हा सामन्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतो.
इंग्लंडच्या घातक खेळाडूंपैकी एक बेन स्टोक्स आयपीएल लिलावात सहभागी होत नाहीये. डेली मिररला माहिती देताना त्याने म्हटले की, "कसोटी क्रिकेट हे माझे प्रथम क्रमांकाचे प्राधान्य आहे आणि मी जो रूटसोबत काम करण्यास उत्सुक आहे, जो कर्णधार म्हणून आमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो." बेन स्टोक्सने पुढे लिहिले की, सध्या त्याला आपले सर्व लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे.
ऍशेसमध्ये खराब कामगिरी
बेन स्टोक्सला उन्हाळी हंगामात इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. अॅशेस मालिकेत स्टोक्सची कामगिरी निराशाजनक होती, जिथे त्याने फक्त 236 धावा केल्या आणि चार विकेट घेतल्या. या मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून 0-4 असा पराभव पत्करावा लागला होता.
बेन स्टोक्सला 2018 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने सर्वात महागडा खेळाडू म्हणून खरेदी केले होते. राजस्थान रॉयल्सने त्याला 12.50 कोटींना खरेदी केले, पण यावेळी राजस्थान संघाने त्याला कायम ठेवले नाही. बेन स्टोक्स कोणत्याही संघासाठी फायदेशीर ठरू शकतो, हा खेळाडू तिन्ही विभागात आपली ताकद दाखवू शकतो. स्टोक्स हा फलंदाजीसोबतच घातक गोलंदाजी करण्यातही तज्ञ आहे. स्टोक्स हा उत्तम क्षेत्ररक्षकही आहे.
टाटा आयपीएलचे शीर्षक प्रायोजक
आयपीएल 2022 सुरु होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक आयपीएलचा टायटल स्पॉन्सर बदलण्यात आला आहे. आयपीएलच्या आयोजकांनी विवो या चिनी कंपनीकडून टायटल स्पॉन्सर हिसकावून ते आता भारतीय कंपनी टाटाला दिले आहे. आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून विवोने स्वतःचे नाव मागे घेतले आहे.