दुबई : ICC T-20 वर्ल्डकप 2021च्या अत्यंत महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह भारताच्या नावे अजून एक लज्जास्पद विक्रमात वाढ झाली आहे. हा लाजिरवाणा विक्रम 14 वर्षांपासून टीम इंडियाची काही पाठ सोडताना दिसत नाहीये.
आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांचा रेकॉर्ड्स खूपच खराब झाला आहे. दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांमध्ये आतापर्यंत एकूण 14 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने यातील केवळ 3 सामने जिंकलेत तर न्यूझीलंडने 10 सामने जिंकले. तर पावसामुळे एक सामना रद्द झाला.
टीम इंडियाने 1987च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला दोनदा पराभूत केलं होतं. यानंतर 2003च्या वर्ल्डकपमध्ये त्यांचा 7 गडी राखून पराभव झाला होता. यानंतरही भारताला किवी संघाविरुद्ध विजयाची आस आहे. रविवारी भारताच्या सामन्यातही अशीच परिस्थिती होती. कालच्या पराभवानंतर भारताचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा संघर्ष कठीण झाला आहे.
आयसीसीच्या आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांचे निकाल पाहूया. यामध्ये एकदिवसीय वर्ल्डकप, T20 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC फायनल) यांचा समावेश आहे.