वेलिंग्टन : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा झाली आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये तब्बल ३ भारतीय आहेत. टीममध्ये स्पिनर एजाज पटेल याचा समावेश करण्यात आलाय. एजाज पटेल न्यूझीलंडमधील प्रथम श्रेणी स्पर्धा असलेल्या प्लंकेट शील्ड टुर्नामेंटमध्ये खेळत आहे. पटेल मागच्या तीन वर्षांमधील या स्पर्धेतला सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. मिचेल सॅण्टनरला दुखापत झाल्यामुळे पटेलची टीममध्ये निवड करण्यात आली. २९ वर्षांचा एजाज पटेल हा मुळचा भारतीय आहे. मुंबईमध्ये जन्मलेल्या एजाज पटेल लहानपणापासूनच न्यूझीलंडमध्ये राहत आहे. मागच्या वर्षी पटेलनं ९ मॅचमध्ये २१.५२ च्या सरासरीनं ४८ विकेट घेतल्या होत्या.
एजाज पटेलबरोबरच या टीममध्ये आणखी एक भारतीय ईश सोदीचाही समावेश आहे. ईश सोदीचा जन्म पंजाबच्या लुढियानामध्ये झाला. अहमदाबादमध्ये जन्म झालेला जीत रावल हादेखील टेस्ट टीममध्ये आहे.
केन विलियमसन (कर्णधार), टॉड एस्टल, टॉम ब्लंडेल, ट्रेन्ट बोल्ट, कॉलीन डे ग्रांडहोम, मॅट हेनरी, टॉम लेथम, हेनरी निशोल्स, एजाज पटेल, जीत रावल, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वेगनेर, बी जे वॅटलिंग
केन विलियमसन (कर्णधार), टॉड एस्टल, ट्रेन्ट बोल्ट, कॉलीन डे ग्रांडहोम, मार्टीन गप्टील, मॅट हेनरी, टॉम लेथम, कॉलीन मुनरो, हेनरी निकोल्स, इश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर, बी जे वॅटलिंग
केन विलियमसन (कर्णधार), मार्क चॅम्पमन, कॉलीन डे ग्रांडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टीन गप्टील, एडम मिल्ने, कॉलीन मुनरो, सेठ रेंस, टीम सायफर्ट, इश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर