U19 Asia World Cup 2024: चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 बाबत वाद अजूनही सुरूच आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार याबतीत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील आपल्या आग्रहावर ठाम आहे. या वादात भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये मोठा सामना रंगणार आहे. नेहमीप्रमाणे या सामन्याची दोन्ही संघांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.
या महिन्याच्या शेवटच्या तारखेला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठी लढत होणार आहे. याचाच अर्थ आजपासून दोन दिवसांनी भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना U19 आशिया चषक 2024 मधील दुसरा सामना असेल. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान याना एकाच गट-A मध्ये ठेवण्यात आले आहेत. 29 नोव्हेंबरपासून या स्पर्धेची सुरुवात होईल आणि भारत पाकिस्तानचा समान हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 नोव्हेंबरला होणार आहे. यूएई शहर दुबई येथे हा महान सामना खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा: IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...
भारतीय अंडर-19 संघ : आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले (उपकर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पानगालिया (विकेटकीपर), अनुराग कवडे (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद अनन, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.
हे ही वाचा: 6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावा
पाकिस्तान अंडर-19 संघ: साद बेग (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोहम्मद अहमद, हारून अर्शद, तय्यब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नावेद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रझा, मोहम्मद रियाजुल्ला , अब्दुल सुभान, फरहान युसूफ, उमर झैब.
हे ही वाचा: IPL: आयपीएल सामना गमावल्यास मालकांचे किती नुकसान होते? जाणून घ्या
2024 ACC अंडर-19 आशिया कपमध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, जपान, यूएई, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, जपान आणि यूएई यांना अ गटात तर अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.दुबईशिवाय शारजाह येथेही या स्पर्धेचे सामने होणार आहेत.