Umpire Shreyas Iyer New Zealand Vs Pakistan Match: एकदिवसीय वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या सराव सामन्यांपैकी पहिल्या सराव सामन्यात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवला आहे. हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पार पडलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडच्या संघाने पराभूत केलं. 345 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने हा 44 व्या ओव्हरमध्येच जिंकला. न्यूझीलंडने सामना 5 गडी राखून जिंकला. या सामन्यामध्ये भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने मैदानात उतरुन पंचगिरी केल्याची चर्चा आहे. या संदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
खरं तर झालं असं की, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या सराव सामन्यात अक्षय तोत्रे नावाचे पंच ऑन फिल्ड अंपायर्सपैकी एक होते. अक्षय यांचा एकंदरित लूक हा अगदीच श्रेयस अय्यर सारखा असल्याचं अनेक चाहत्यांनी हेरलं. गुलाबी रंगाचा शर्ट डोक्यावर काळी हॅट आणि गॉगलबरोबरच कोरलेल्या दाढी मिशीमध्ये अक्षय यांच्याऐवजी श्रेयस अय्यरच पंचगिरी करण्यासाठी उभा राहिला की काय अशी चर्चा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात श्रेयस अय्यर अंपायर होता, असं अनेकांनी या पंचांचा फोटो शेअर करत म्हटलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हे पंच अगदीच श्रेयस अय्यरसारखे सारखेच दिसत आहेत असं म्हटलं आहे. यावरुन अनेक मिम्स आणि मजेदार जोक्सही व्हायरल झाले आहेत. तुम्हीच पाहा हे व्हिडीओ...
1) खरा आयडी वापरुन समोर या
real id se aao shreyas Iyer
— kunal jhurani (@myhumour_side) September 29, 2023
2) अय्यर भाई
Iyer bhai
— Rahul Varma (@urscoolrahul) September 29, 2023
3) आराम नंतर आधी पंचगिरी करुयात म्हणत आला मैदानावर
Shreyas Iyer starts his warm-up for the world cup a day before the rest of the Indian team does. Respect.
— Zucker Doctor (@DoctorLFC) September 29, 2023
4) श्रेयस अय्यर आहे का हा?
Shreyash Iyer ??
— Shivam Shukla (@Shukla_j_shivam) September 29, 2023
5) अय्यर 10 वर्षानंतर
Shreyas Iyer after 10 years
— Underground Introvert (@ug_introvert) September 29, 2023
अक्षय तोत्रे हे 36 वर्षांचे आहेत. अक्षय हे इंदूरचे आहेत. त्यांनी 22 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, 30 अ श्रेणी सामने आणि 41 टी-20 सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिलं आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या 2023 च्या पर्वामध्ये 6 सामन्यांमध्ये सामन्यांशी संबंधित अधिकारी म्हणून काम पाहिलं होतं.
दुसरीकडे अक्षय तोत्रे ज्या श्रेयससारखे दिसत असल्याची चर्चा आहे त्याच्याबद्दल बोलायचं झाल्यास श्रेयस दुखापतीनंतर नुकताच मैदानावर परतला आहे. मात्र पुनरागमन केल्यानंतर त्याला अगदी काही सामनेच खेळता आले आहेत. मुंबईकर श्रेयसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेमध्ये एकूण 156 धावा केल्या. या सामन्यांमधील त्याची सरासरी 56 इतकी आहे. तर स्ट्राइक रेट 110.64 आहे. त्याने या मालिकेमध्ये करिअरमधील तिसरं अर्धशतक झळकावलं आहे. इंदूरमधील एकदिवसीय सामन्यामध्ये झळकावलेलं शतकं हे श्रेयसच्या सर्व प्रकारच्या क्रिकेट कारकिर्दीमधील चौथं शतक ठरलं.