मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पती-पत्नी सध्या जीम ट्रेनिंगही एकत्रच घेताना दिसत आहेत. यामुळे, दोघांना जास्तीत जास्त वेळ एकमेकांनाही देता येतोय.
फिटनेसची सतत काळजी घेणारा विराट सध्या मानेला झालेल्या दुखापतीतून सावरतोय. पण, तरीही त्याचं जीम ट्रेनिंग सुरूच आहे. विराटनं इन्स्टाग्रामवर एक वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये पत्नी अनुष्काही त्याच्यासोबत जीममध्ये घाम गाळताना दिसतेय. 'ट्रेनिंग टुगेदर मेक्स इट इव्हन बेटर' असं कॅप्शनही विराटनं या व्हिडिओला दिलंय.
या व्हिडिओत विराट म्हणतोय, 'मित्रांनो, आज माझ्यासोबत बॉस आहे...' आणि तो आपला कॅमेरा अनुष्काकडे वळवतो... अनुष्का इथं एका खास मशीनवर कार्डिओ एक्सरसाइज करताना दिसते. या व्हिडिओत विराट अनुष्काला प्रोत्साहन देतानाही दिसतो... गंमतीत म्हणतो, ती माझ्यापेक्षाही जास्त वेळ करू शकते... आणि अनुष्का हसत म्हणते 'रबिशss'
अवघ्या काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला दिसतोय.