नागपूरच्या मैदानात विराटचं चाललंय काय? जर्सी वर केली दातात पकडली अन्...; 'ती' कृती चर्चेत

Ind vs Eng 1st ODI Training Session: मागील काही दिवसांपासून भारतीय संघ विदर्भातील नागपूरमधील मैदानावर सराव करत असून या सरावातील एक फोटो व्हायरल झालाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2025, 10:19 AM IST
नागपूरच्या मैदानात विराटचं चाललंय काय? जर्सी वर केली दातात पकडली अन्...; 'ती' कृती चर्चेत title=
विराटचा फोटो व्हायरल (फोटो एक्सवरुन साभार)

Ind vs Eng 1st ODI Training Session: भारत आणि इंग्लंडदरम्यान आजपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. पाहिलाच सामना नागपूरमध्ये होत असून दुपारी दीड वाजल्यापासून सामना खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर या मालिकेला विशेष महत्त्व असून या मालिकेनंतरच 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ निवडला जाणार आहे. म्हणूनच भारतीय खेळाडू मागील काही दिवसांपासून कसून सराव करत आहेत. मात्र या सरावदरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने केलेली एक कृती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

काय व्हायरल झालंय?

खरं तर विराट कोहली हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. प्रत्येक तरुण खेळाडूला आपल्याला विराटसारखी शरीरयष्टी कमवता आली पाहिजे असं वाटतं. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये विराटने ज्या पद्धतीने शरीरयष्टी कमवण्यासाठी कष्ट केले आणि ती कायम ठेवली आहे ते पाहून अनेकजण थक्क होतात. एकेकाळी भरलेल्या गालांचा गोल गुटगुटीत दिसणारा विराट आज सिक्स पॅक्स आणि सर्वात वेगाने धाव घेणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र आपल्या इन्स्टाग्रामवरुन व्यायाम आणि शर्टलेस फोटो पोस्ट करणाऱ्या विराटने विदर्भातील मैदानावर सरावादरम्यानच आपली स्लीव्हलेस जर्सी वर करुन सिक्स पॅक्स दाखवले. 

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर विराटचे हे जर्सी वर करुन ती दातामध्ये पकडून आपल्या सिक्स पॅक्सकडे पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विराट कोहलीचा फिटनेस पाहा, अशा कॅप्शनसहीत फोटो व्हायरल झाले आहेत. 

विराट ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर

विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेमध्ये ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर आहे. विराट 14 हजार धावांपासून अवघ्या 96 धावा दूर आहे. केवळ सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनाच 50 षटकांच्या सामन्यांमध्ये 14 हजारांपेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र विराट सर्वात कमी सामान्यांमध्ये 14 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा खेळाडू ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली रणजी सामना खेळाल होता. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर विराटला रणजी सामन्यात खेळताना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी गर्दी केलेली.

दिल्ली आणि रेल्वेच्या संघादरम्यान झालेल्या या सामन्याची जगभरात केवळ विराटमुळे चर्चा झालेली. मात्र 12 वर्षानंतर रणजी चषक खेळताना विराट अवघ्या 6 धावांवर बाद झाला. विराटला बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यावरुन त्याच्यावर टीकेची झोड उठत असल्याने एकदिवसीय सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.