विराट कोहलीचा पॉली उमरीगर पुरस्कारानं सन्मान होणार

मागच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचा मोठ्या पुरस्कारानं सन्मान होणार आहे.

Updated: Jun 7, 2018, 05:29 PM IST
विराट कोहलीचा पॉली उमरीगर पुरस्कारानं सन्मान होणार title=

मुंबई : मागच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचा मोठ्या पुरस्कारानं सन्मान होणार आहे. विराट कोहलीला पॉली उमरीगर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. बीसीसीआयनं ही घोषणा केली आहे. विराटला लागोपाठ दोन वर्ष (2016-17 आणि 2017-18) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उमरीगर पुरस्कार देण्यात येणार आहे. बंगळुरूमध्ये 12 जूनला हा सोहळा पार पडणार आहे. हा पुरस्कार मिळवण्याची विराट कोहलीची ही चौथी वेळ आहे. याआधी 2011-12, 2014-15, 2015-16 यावर्षी विराटला हा पुरस्कार मिळाला होता. याआधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार यांनाही हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 5 लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन उमरीगर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.

कोण आहेत पॉली उमरीगर?

28 मार्च 1926 साली जन्म झालेले पाहलन रतनजी उमरगदीर भारताचे शानदार बॅट्समन आणि कर्णधार होते. 1955 ते 1958 पर्यंत त्यांनी 8 टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं. उमरीगर यांनी 59 टेस्ट मॅचमध्ये 3,631 रन केले. यामध्ये 12 शतकांचा समावेश होता. भारताकडून द्विशतक लगावणारे ते पहिले बॅट्समन होते. बॅट्समनबरोबरच उमरीगर जलद आणि स्पिन बॉलरही होते. 

का दिला जातो पॉली उमरीगर पुरस्कार?

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर उमरीगर 1970 साली भारतीय टीमचे मॅनेजरही होते. 1978 आणि 1982मध्ये उमरीगर भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्षही होते. उमरीगर बीसीसीआयचे सचिवही होते. 1962 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 1998-99मध्ये सी.के.नायडू ट्रॉफीनं सन्मानित करण्यात आलं. उमरीगर यांनी क्रिकेट प्रशिक्षणावर एक पुस्तकही लिहीलं आहे. उमरीगर हे वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटरही होते.