मुंबई : कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने शानदार खेळ दाखवूनही हा सामना चैन्नईने फक्त 4 धावांनी गमावला आहे. पंजाबने चैन्नईला आपल्या घरात पहिल्यांदाच हरवलं आङे. चैन्नईने आतापर्यंत दोन सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात अगदी 4 धावांकरता त्यांना खेळ गमवावा लागला. चेन्नईकडून महेंद्र सिंह धोनीन अगदी शेवटपर्यंत टिकून राहिला पण विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 193 धावा केल्या आहेत.
धोनीला पाठीचा प्रचंड त्रास होत आहे. फलंदाजी करताना याचा त्याला भरपूर त्रास झाला. मात्र मैदानावर अगदी खंबीरपणे तो उभा होता. धोनीने 44 बॉलमध्ये आपल्या खेळात सहा षटकार, 5 चौके असा दमदार खेळ दाखवला. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 76 धावांची गरज होती आणि ते असंभव वाटत होते. 18 आणि 19 व्या ओव्हरमध्ये 19 -19 अशा धावा करून शेवटच्या 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र तेव्हा फक्त 12 धावा करू शकला.
मॅचनंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला की, पंजाबकडून आलेल्या उत्तम चेंडूमुळे आम्ही हा खेळ हरलो आहे. धोनीने पाठीच्या दुखवण्याबाबत सांगितलं की, माझं पाठीचं दुखण वाढलं आहे मात्र देव मला ताकद देत आहे. मला पाठीची मदत घेऊन चांगले शॉर्ट लावण्याची गरज लागत नाही. मी आपल्या हातांनी षटकार आणि चौके मारू शकतो.