Video : शुभमन किंवा हार्दिक नाही तर 'हा' आहे अनन्या पांडेचा आवडता स्पोर्ट्स स्टार

एका मुलाखतीत अनन्या पांडे हिने तिच्या ऑल टाइम फेव्हरेट स्पोर्ट्स पर्सनबाबत खुलासा केला आहे. आश्चर्याची गोष्ट ही की यामध्ये तिने शुभमन किंवा हार्दिकचं नाव घेतलेलं नाही. 

पुजा पवार | Updated: Sep 14, 2024, 06:47 PM IST
Video : शुभमन किंवा हार्दिक नाही तर 'हा' आहे अनन्या पांडेचा आवडता स्पोर्ट्स स्टार  title=
(Photo Credit : Social Media)

Ananya Pande Favourite Sports Person : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही अनेक युवकांची क्रश आहे. अनन्या ही क्रिकेटची सुद्धा मोठी चाहती असून ती आयपीएलमध्ये अनेकदा कोलकाता नाईट रायडर्स टीमला सपोर्ट करताना दिसते. अनन्या पांडे हिने भारतीय क्रिकेट टीमचा युवा ओपनर शुभमन गिल सोबत एका जाहिरातीचे शूट केले. ज्यात दोघांची केमेस्ट्री त्यांच्या फॅन्सला आवडली. तर काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेचं नाव हे हार्दिक पंड्या सोबत सुद्धा जोडलं गेलं होतं दोघे अंबानींच्या लग्नात एकत्र डान्स करताना दिसले होते. मात्र आता एका मुलाखतीत अनन्या पांडे हिने तिच्या ऑल टाइम फेव्हरेट स्पोर्ट्स पर्सनबाबत खुलासा केला आहे. आश्चर्याची गोष्ट ही की यामध्ये तिने शुभमन किंवा हार्दिकचं नाव घेतलेलं नाही. 

अभिनेत्री अनन्या पांडे हिला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, तुझा ऑल टाइम फेव्हरेट स्पोर्ट्स पर्सन कोण आहे? यावर अनन्याने वेळ न घालवता 'विराट कोहली' असे उत्तर दिले. गिल आणि अनन्या एका जाहिरातीच्या शूट दरम्यान एकत्र आले होते त्यावेळी अनन्याने गिलला मिठी मारली ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे शुभमन गिलचं नाव सारा अली खान, सारा तेंडुलकरनंतर अनन्या पांडेशी जोडलं गेलं. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळे कॉमेंट करू लागले. 

अनन्याचा हार्दिक सोबत व्हिडीओ व्हायरल : 

अनन्या पांडे आणि हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघे मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत याच्या हळदीत नाचताना दिसले. अनन्या आणि हार्दिकचा हा व्हिडीओ लोकांना फार आवडला. यानंतर हार्दिकने पूर्व पत्नी नताशा सोबत  घटस्फोट घेतल्यावर अनन्याशी तो जवळीक साधत असून दोघे देत करत असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. 

हेही वाचा : WWE चे 5 खतरनाक रेसलर, रिंगमध्ये भल्याभल्यांना चारली धूळ आता अभिनयातही सुपर हिट

 

टेस्ट सिरीजसाठी शुभमन गिल करतोय सराव : 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबर रोजी टेस्ट सिरीज मधला पहिला सामना पार पडणार आहे. चेन्नईच्या स्टेडियमवर हा सामना होणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बांगलादेश विरुद्ध टीम इंडियात शुभमन गिलची निवड करण्यात आली असल्याने गिल यासाठी सराव करत आहे. 

पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ :  

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.