Darshan Nalkande: हार्दिक पांड्याने काढला 'हुकमी एक्का', मराठमोळा दर्शन नळकांडे आहे तरी कोण?

Who is Darshan Nalkande: चेन्नई विरुद्धच्या (GT vs CSK) महत्त्वाच्या सामन्यात यश दयाल याच्या जागी दर्शन नळकांडे याला संघात स्थान देण्यात आलं. दर्शन नळकांडे आहे तरी कोण? जाणून घ्या

Updated: May 23, 2023, 08:53 PM IST
Darshan Nalkande: हार्दिक पांड्याने काढला 'हुकमी एक्का', मराठमोळा दर्शन नळकांडे आहे तरी कोण? title=
Darshan Nalkande

GT vs CSK, Darshan Nalkande: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans) यांच्यात पहिला क्वालिफायर सामना खेळवला जातोय. हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याला संघातील बदलाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने यश दयालच्या ऐवजी दर्शन नळकांडे संघात असेल, असं सांगितलं. दर्शन नळकांडे याचं नाव ऐकताच अनेकांच्या भूवया उंचाल्या. हा दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) आहे तरी कोण? असा सवाल विचारण्यात येत आहे. दर्शन नळकांडे हा महाराष्ट्रातील खेळाडू आहे.

दर्शन नळकांडे याचा जन्म चार ऑक्टोबर 1998 रोजी वर्ध्यात झाला. दर्शन विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. दर्शनचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करतात. तर आई वकील आहे. त्या महाविद्यालयात देखील शिकवतात. दर्शन नळकांडे याचं कुटूंब अकोल्यातील जठारपेठ या ठिकाणी राहतं. आई वडिलांनी नेहमी दर्शनला सपोर्ट केला. त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्याच्या कुटुंबियांचा मोठा हात आहे.

आयपीएल करियर

गुजरात टायटन्सने मागील हंगामाच्या लिलावात दर्शन नळकांडे याला 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत विकत घेतलं होतं. त्यावेळी त्याला 2 सामने खेळले आणि 2 महत्त्वाच्या विकेट देखील काढल्या होत्या. 2018 मध्ये पंजाब किंग्स संघाने दर्शन नळकांडे याला विकत घतलं होतं. मात्र, त्याला मैदानात उतरण्याची आणि संघासाठी खेळण्याची कधी संधी मिळाली नाही. ऑलराऊंडर कामगिरीमुळे हार्दिकने त्याची निवड केल्याचं बोललं गेलं होतं.

मागील हंगामात 8 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना त्याने आयपीएल डेब्यु केला. या सामन्यात 3 ओव्हरमध्ये त्याने 37 धावा देत 2 विकेट काढल्या होत्या. मात्र, फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

मागील हंगामात 11 एप्रिल रोजी झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याला दुसरी संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने 2.1 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन फक्त 1 विकेट घेतली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात त्याला तिसरी संधी मिळालीये.

आणखी वाचा - LSG vs MI: क्वालिफायरची प्रॅक्टिस करताना झाली चूक अन् जमिनीवर कोसळला लखनऊचा खेळाडू; पाहा Video

दरम्यान, दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) याला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली असती. दर्शनच्या बॉलवर ऋतुराज गायकवाड याने फटका मारला पण बॉल थेट शुभमन गिलच्या हातात गेला. त्यावेळी अंपायरने नो बॉल दिला. चेन्नईच्या मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. त्यानंतर फ्री हीटवर ऋतुराजने सिक्स खेचलाय. त्यानंतर ऋतुराजने त्याची पिसं काढल्याचं दिसून आलं. डेथ ओव्हरमध्ये कशी बॉलिंग करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.