कोलंबो : श्रीलंका (Sri Lanka) विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याआधी टीम इंडिया (Team India) मोठा झटका बसला. अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याचा (Krunal Pandya Corona Posotive) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आज खेळवण्यात येणारा सामना स्थगित करावा लागला. दुसरा सामना हा बुधवारी 28 जुलैला खेळवण्यात येणार आहे. आता कृणालला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्या जागी दुसऱ्या सामन्यात एका जागा रिकामी झाली आहे. या एका जागेसाठी 3 खेळाडूंची नाव चर्चेत आहेत. (Who will get a chance in the second T20 match against Sri Lanka due to Krunal Pandya's corona positive)
कोण आहेत ते खेळाडू?
कृणालच्या जागी टीम मॅनेजमेंट नितीश राणाला (Nitish Rana) संधी देऊ शकते. नितीश बॅटिंगसह स्पिन बॉलिंगही करतो. त्याने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी केली. दुसरा दावेदार आहे तो (Krishnappa Gowtham) कृष्णप्पा गौतम. गौतमही ऑलराऊंडर आहे. गौतमने श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत उल्लेखनीय गोलंदाजी केली होती. मात्र त्याला बॅटिंगने कमाल दाखवता आली नाही. तिसरा दावेदार म्हणजे (Rahul Chahar) राहुल चाहर. राहुल टी 20 स्पेशालिस्ट खेळाडू आहे. त्यामुळे एका जागेसाठी 3 खेळाडूंमधून कोण भाग्यवान ठरेल, हे लवकरच समजेल.
टीम इंडिया आघाडीवर
टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून भारताला टी 20 मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा दुसरा सामना महत्वाचा असणार आहे.