मुंबई : ऑस्ट्रेलियात ४ मॅचच्या टेस्ट सीरीजमध्ये विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेचं सगळ्याच स्तरावरून (Once Again Hats of Ajinky Rahane) कौतुक होत आहे. अजिंक्य रहाणेने विजयानंतर 'कांगारू केक' कापण्यास नकार दिला होता. यावरूनही त्याचं कौतुक झालं. या मागचा अजिंक्यचा नेमका विचार काय होता? याचा खुलासा स्वतः अजिंक्य रहाणेने केला आहे.
क्रिकेट कॉमेंटेटर हर्ष भोगलेसोबत झालेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा झाला. हर्षा भोगले यांनी अजिंक्य रहाणेला प्रश्न विचारला की,'भारताच्या विजयानंतर कांगारूचा केक कापण्यास का नकार दिला?' त्यावर अजिंक्य रहाणेने अतिशय नम्रपणे उत्तर दिलं की,'कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पशु आहे. त्यामुळे मी नकार दिला. आणि विरोधी संघासोबत द्वंद्व असावं पण तुम्हाला त्यांचा सन्मान करायला हवा. जरी आपण विजय मिळवला, इतिहास रचला तरी प्रतिस्पर्धी संघाचा सन्मान हा करायलाच हवा. याच कारणामुळे मी कांगारूचा केक कापण्यास नकार दिला.'
Always wanted to ask @ajinkyarahane88 about the cake he was offered with a kangaroo on it and why he refused to cut it. The small things that tell you more about a person. More of this conversation on his FB page. pic.twitter.com/YZwwQKlFJq
— Harsha Bhogle (@bhogleharsha) January 30, 2021
पुढच्या महिन्यात इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरीजमध्ये रहाणे उपकॅप्टन असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर उपकॅप्टन पद सांभाळणं त्याच्यासाठी वेगळं असेल का? असा देखील सवाल या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर रहाणेने अतिशय नम्रपणे म्हटलं की,'अजिबात नाही. कोहली टेस्ट टीममध्ये कॅप्टन आहे आणि राहिलं. मी उपकॅप्टन आहे. त्याच्या अनुपस्थित मला कॅप्टनपद देण्यात आलं होतं. माझं काम टीमच्या यशासाठी प्रदर्शन करणं आहे.'