WI vs IND : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये भारताने वेस्ट इंडिजचा ( Team India ) धुव्वा उडवला आहे. या सामन्यात भारताने 200 रन्सने वेस्ट इंडिजला ( West Indies ) मात दिलीये. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने विजय मिळवल्यामुळे टीम इंडियने 2-1 असा सिरीजवर देखील कब्जा केला आहे.
या सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये ( Team India ) पहिल्यांदा फलंदाजी करत 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 351 रन्स बनवले. या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना 151 रन्समध्ये वेस्ट इंडिजचा ऑलआऊट झाला.
टेस्ट सिरीजनंतर टीम इंडियाने ( Team India ) वनडे सिरीजवरही कब्जा केलाय. तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 352 धावांची गरज होती. मात्र वेस्ट इंडिजला ( West Indies ) चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये मुकेश कुमारने ब्रेंडन किंगला शून्यावर माघारी धाडलं. यानंतर काइल मेयर्सही स्वस्तात बाद झाला. कर्णधार शाई होप 5, शिमरॉन हिटमायर 4 आणि केसी कार्टी 6 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतले.
भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजच्या ( West Indies ) गोलंदाजांचा धुव्वा उडवला. टीमच्या डावाची सुरुवात करणाऱ्या इशान किशन आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) यांनी पहिल्या विकेटसाठी 143 रन्सची पार्टनरशिप केली. यावेळी इशानने 77 आणि शुभमन गिलने 87 रन्सची उत्तम खेळी केली. यावेळी संजू सॅमसनने वेगवान फलंदाजी करताना 41 चेंडूत 51 रन्स केले. याशिवाय कर्णधार हार्दिक पंड्यानेही ( Hardik Pandya ) कॅप्टन्स इनिंग खेळली.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला वनडेमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. या खेळाडूने संधीचा पुरेपूर फायदा घेतलाय. कर्णधार हार्दिक पांड्याने मुकेश कुमारचे पहिली ओव्हर दिली आणि याच ओव्हरमध्ये त्याने विंडीजा पहिला धक्का दिला. अखेर या सामन्यात मुकेशने 5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूरनेही या सामन्यात चांगली गोलंदाजी केलीये.