Pakistan Cricket : पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर, बाबर आझम कॅप्टन्सीचा राजीनामा देणार? स्वत:च केला खुलासा

Babar Azam Captaincy : पाकिस्तानला विश्वचषकच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, परंतु बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी खूपच खराब झाली. त्यामुळे आता बाबरच्या राजीनाम्याची मागणी होतीये.

सौरभ तळेकर | Updated: Nov 12, 2023, 02:59 PM IST
Pakistan Cricket : पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर, बाबर आझम कॅप्टन्सीचा राजीनामा देणार? स्वत:च केला खुलासा title=
Babar Azam resign from the captaincy

Pakistan Cricket News : इंग्लंडने जाताजाता पाकिस्तानचं स्वप्न धुळीस मिळवलं. वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) 44 व्या सामन्यात इंग्लंडकडून 93 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह पाकिस्तानचा वर्ल्ड कप 2023 मधील प्रवास संपलाय. पाकिस्तानची (Pakistan Cricket) वर्ल्ड कपमध्ये सुमार कामगिरी पहायला मिळाली. भारताने पाकिस्तानच्या विजयाची गाडी रुळावरून खाली उतरवल्यानंतर पाकिस्तानला पुढील चारही सामने जिंकता आले नाहीत. त्यामुळे आता बाबर आझमवर  (Babar Azam) मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. बाबरने कॅप्टन्सी सोडावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता बाबर कॅप्टन्सी सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर आता कॅप्टन बाबरने रोखठोक उत्तर दिलंय. 

काय म्हणाला Babar Azam ?

आपण एकत्र बसून चुका बघू. यातून आपण धडा घेऊ आणि आपल्या चुकांवर चर्चा करू. मला संघाच्या पुनर्बांधणीचे नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असं बाबर आझम म्हणाला होता. त्यामुळे बाबर आझम कॅप्टन्सीचा राजीनामा देणार नाही याचे संकेत दिले आहेत.

गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली नाही. तो म्हणाला, 'आम्ही खूप धावा खर्च केल्या. आम्ही शेवटच्या मिनिटात बरेच खराब चेंडू टाकले. आमच्या फिरकीपटूंनी विकेट घेतल्या नाहीत, ज्याचा अजिबात फायदा झाला नाही. मधल्या षटकांमध्ये विकेट्स घ्यायच्या असल्याने त्याचाही मोठा परिणाम झाला, असंही बाबर आझम म्हणाला आहे.

दरम्यान, पाकिस्तानला विश्वचषकच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, परंतु बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी खूपच खराब होती. त्यामुळे बाबर आझमची कामगिरीवर टीका केली जातीये. मात्र, काही खेळाडूंनी बाबर आझमची पाठराखण केलीये.

वसिम अक्रम म्हणतो...

एकटा कर्णधार सामना खेळत नाही. त्याने वर्ल्डकप स्पर्धेत आणि आशिया चषक स्पर्धेत नेतृत्व करत असताना चुका केल्या. मात्र त्याची एकट्याची चूक नाही. गेल्या 1 वर्षांपासुन पाकिस्तान क्रिकेटचं सिस्टम चूका करतंय. इथे खेळाडूंनाच माहीत नाही की कोच कोण आहे? तुम्ही त्याला बळीचा बकरा बनवू शकत नाही, असं म्हणत वसिम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले आहेत.