'या' अभिनेत्याशी मिताली राज बांधणार लग्नगाठ? बऱ्याच मुलांचं तुटणार हृदय!

लीकडेच एका टीव्ही शोमध्ये तिने तिच्या लग्नाची निवड सांगितली आहे.

Updated: Nov 22, 2021, 09:00 AM IST
'या' अभिनेत्याशी मिताली राज बांधणार लग्नगाठ? बऱ्याच मुलांचं तुटणार हृदय! title=

मुंबई : मिताली राज सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. ती 22 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाशी जोडलेली आहे. अलीकडेच एका टीव्ही शोमध्ये तिने तिच्या लग्नाची निवड सांगितली आहे.

'कपिल शर्मा शो'मध्ये दिसली मिताली

काही दिवसांपूर्वी मिताली राज 'कपिल शर्मा शो'मध्ये उपस्थित राहिली होती. यासोबत तिच्या सहकारी क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी यांनी देखील शोमध्ये उपस्थिती लावली होती.

या शोमध्ये कपिल शर्माने मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी यांना विचारलं की तुला क्रिकेटर्सशी लग्न करायचे आहे की बॉलिवूडच्या कोणत्या कलाकारांशी? 

या अभिनेत्याशी लग्न करू इच्छिते मिताली?

कपिल शर्माच्या प्रश्नाला मिताली राजने दिलखुलास उत्तर दिलंय. ती म्हणाली, बॉलिवूडशी संबंधित कलाकाराशी लग्न करायला माझी हरकत नाही. मात्र जो मला आवडतो त्याचं लग्न झालंय. आमीर खान माझा आवडता अभिनेता आहे.

हरमनप्रीतला रणवीर आवडतो

हरमनप्रीत कौर गमतीने म्हणाली, 'मला रणवीर सिंग आवडतो, पण तो त्याच्या पत्नीसोबत सेट आहे. दरम्यान कपिल शर्माने अनेकदा असं सांगितलं आहे की त्याला दीपिका पदुकोण फार आवडते. यासाठीच हरमनप्रीतने असं मिश्किल उत्तर दिलं. 

वेदा कृष्णमूर्तिची मस्करी

यावेळी वेदा कृष्णमूर्ती एकदम मस्तीच्या मूडमध्ये दिसली, ती म्हणाली, 'तुला दीपिका आवडते, मला रणवीर आवडतो, आम्ही दोघं सेटिंग करून घेऊ'. तर दुसरीकडे झुलन गोस्वामीने सांगितलं की, मला शाहरुख खान आवडतो.

मितालीचं पहिलं प्रेम क्रिकेट नव्हतं. वडिलांच्या सांगण्यावरून मिताली राज क्रिकेटर बनली. पण तिला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच नृत्यांगना व्हायचं होतं. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतलं आहे. 

ODI मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

मिताली राजने 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण केले. तेव्हापासून आजतागायत तिच्या बॅटने धावा काढल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार हून अधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये तिच्या नावावर 7 शतके आहेत. यासोबतच तिने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 2 हजार 364 धावा केल्या आहेत.