World Cup Ravindra Jadeja Celebration Video Goes Viral: भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यामध्ये भारताने दमदार पुनरागमन केलं आहे. बांगलादेशच्या सलामीवीरांना उत्तम फलंदाजी करत संयमी सुरुवात करुन दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याप्रमाणे टिच्चून गोलंदाजी करत दमदार कमबॅक केलं आहे. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय क्षेत्ररक्षकांची चांगली साथ लाभली. शुभमन गिलने 2 उत्तम कॅच पकडल्या. मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते सर जडेजा नावाने लोकप्रिय असलेल्या रविंद्र जडेजाने पकडलेल्या एका कॅचने.
झालं असं की, सामन्यातील 43 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. बांगलादेशचा विकेटकीपर बॅट्समन मुश्फिकुर रहीम हा चांगला सेट झाला होता. 45 बॉलमध्ये 38 धावा करुन मुश्फिकुर रहीम बुमराहच्या ओव्हरमधील तिसरा चेंडू खेळत होता. बुमराहने ऑफ स्टम्प बाहेर टाकलेला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न रहीमने केला. मात्र पॉइण्टला उभ्या असलेल्या जडेजाने चेंडू आपल्या दिशेने येताना पाहून स्वत:च्या उजवीकडे झेपावत हवेत असतानाच चेंडू अचूक टीपला. जडेजाने तब्बल दीड ते 2 फुटांपर्यंत डाइव्ह मारत हा चेंडू पकडला.
विशेष म्हणजे जडेजाने हा भन्नाट झेल घेतल्यानंतर तो जागेवर उभा राहिला आणि गळ्यात माळ घातल्याप्रमाणे हातवारे करु लागला. खरं तर जडेजा भारतीय संघ ज्या ठिकाणी बसला होता तिकडे पॅव्हेलियनकडे पाहत सर्वोत्तम फिल्डींगसाठी दर सामन्यानंतर दिलं जाणारं मेडल या कॅचसाठी आपल्यालाच मिळणार असा दावा फिल्डींग कोचकडे पाहून करत होता. जडेजाचे हे हातवारे पाहून मैदानाबाहेर बसलेले प्रशिक्षक आणि इतर खेळाडूनही हसू लागले. भारताचे फिल्डींग कोच रवीकृष्णन् श्रीधर यांनी मैदानाबाहेरच हातात असलेल्या बाटल्यांनी टाळ्या वाजवत जडेजाचं कौतुक करत स्मीतहास्य केलं. या संदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.
1)
Jadeja asking for the medal from the fielding coach...!!! pic.twitter.com/udCboRzmRN
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
2)
Appreciation Tweet for Ravindra Jadeja
What a great catch. #INDvsBAN #ViratKohli #HardikPandya #IndianCricket #indiavsbangladesh #INDvBAN Litton Das #Shami pic.twitter.com/uW09wBDkGp
— Lucifer 45 (@1m_lucifer45) October 19, 2023
3)
Jadeja straight away wants that fielding medal and he hugged KL RAHUL straight away. Loves this bondpic.twitter.com/whW48Xm05y
— KL Siku Kumar (@KL_Siku_Kumar1) October 19, 2023
4)
What a catch by the best fielder of world Ravindra Jadeja. This is certainly one contender for best catch of #CWC23. #indiavsbangladesh #INDvsBan #HardikPandya pic.twitter.com/G08GaMLO8h
— Ganesh (@me_ganesh14) October 19, 2023
5)
WHAT A CATCH BY RAVINDRA JADEJA…!!!
- Sir Jadeja, The Best Fielder in The World. pic.twitter.com/b39yn74XSa
— Cricket(@ImTanujSingh) October 19, 2023
जडेजाबरोबरच शुभमन गिलनेही 2 उत्तम झेल घेतले. लिटन दासला रविंद्र जडेजाने झेलबाद केलं. हा झेल शुभमननेच घेतला. तसेच तौहीद हृदोय हा मोठा फटका मारण्याच्या नादात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर शुभमन गील करवी झेलबाद झाला. वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडू फारच उत्तम दर्जाची फिल्डींग करत असल्याने दर सामन्यानंतर सर्वोत्तम झेल घेणाऱ्या खेळाडूला ड्रेसिंग रुममध्ये मेडल दिलं जात. आतापर्यंतच्या स्पर्धेत विराट कोहली, के. एल. राहुलला हे संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिलं जाणार पदक मिळालं आहे. आता या भन्नाट झेलसहीत जडेजाने या मेडलवर दावा केला आहे. त्याला हे मेडल मिळतं हे येणाऱ्या काळातच समजेल.